23 February 2025 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोरोनाविरोधात लस महत्त्वपूर्ण साधन | लवकरात लवकर आपल्याकडे ती असेल - WHO

Covid19 Vaccine, World Health Organization, WHO

वॉशिंग्टन, २२ ऑगस्ट : जगभरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना नेमका कधी जाईल, असा प्रश्न प्रत्येकाल सतावत आहे. कोरोनासोबत जगणं सुरू आहे, पण ते तितकच कठिणही आहे. त्यामुळे, कोरोनाला हद्दपार करुन पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे आपला दिनक्रम सुरू व्हावा, असे लोकांना वाटते. मात्र, अद्याप ते शक्यच नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात बोलताना WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानॉम गेब्रयेसिस यांनी अंदाज व्यक्त केला आहे. साधारपणे 2 वर्षात या व्हायरसचा प्रभाव संपुष्टात येईल, असे गेब्रयेसिस यांनी म्हटलंय. त्यासाठी, जगातील सर्वच देशांनी एकत्र येऊन लसीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.

ट्रोडोस यांनी कोरोना व्हायरसची तुलना 1918 सालच्या स्पेनिश फ्लूसोबत केली आहे. जेनिव्हा येथील एका परिषदेत बोलताना ट्रेड्रोस यांनी कोरोनाचं संकट आणखी किती दिवस राहिल याचेही भाकित केले. सन 1918 साली आलेल्या स्पेनिश फ्लूचा नायनाट होण्यास 2 वर्षांचा कालावधी लागला होता. सध्याच्या परिस्थितीत तंत्रज्ञान व कनेक्टिव्हीटीमुळे व्हायरस लवकर पसरत आहे. आपण एकमेकांसोबत जोडले गेलो आहोत, एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे, हा व्हायरस वेगाने पसरत आहे. मात्र, कोरोनाला थांबविण्याचं तंत्रज्ञान आणि ज्ञानही आपल्याकडे आहे. जागतिकीकरण, संपर्कप्रणाली आणि मित्रत्वामुळे थोडं नुकसान आहे, पण त्यामुळेच उच्चतम तंत्रज्ञानाचा फायदाही होत आहे, असे ट्रेडोस यांनी सांगितले.

टेड्रोस गेबेरियसस यांनी लसी आल्यानंतर असणाऱ्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. गेबेरियसस म्हणाले,” कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस हे महत्त्वपूर्ण साधन असणार आहे, पण त्यामुळे कोरोनाची साथ संपणार नाही.” गेबेरियसस यांनी सांगितलं की,”करोनाविरोधात लस हे एक महत्त्वपूर्ण साधन असेल. आम्हाला आशा आहे की, लवकरात लवकर आपल्याकडे ती असेल. आपल्याकडे लस आली तरी आम्ही अशी खात्री देत नाही की, त्यामुळे करोना महामारी संपेल”, असं पत्रकार परिषदेत बोलताना टेड्रोस म्हणाले.

“आपल्याकडे सध्या असलेल्या साधनांचा वापर करून हा विषाणू नियंत्रित करण्यासाठी आणि यापासून एकमेकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या दैनदिन जीवनात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. तथाकथित लॉकडाउनमुळे प्रसाराचा झाला नाही, मात्र लॉकडाऊन हा कोणत्याही देशासाठी दीर्घकालीन उपाय नाही,” असं ते म्हणाले.

टेड्रोस यांनी जगभरातील सरकारांना आणि लोकांना आवाहन केलं आहे. “प्रत्येक देशातील सरकारनं सार्वजनिक आरोग्यावर अधिक लक्ष द्यावं. त्याचबरोबर लोकांनीही वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासंदर्भातील काही गोष्टी कायमस्वरूपी बदलण्याची गरज आहे,” असं आवाहन केलं. “आपल्या जीवन की उदर्निवाह वा आरोग्य की अर्थव्यवस्था अशी काही निवड करण्याची गरज नाही. ही एक चुकीची निवड आहे. उलट या महामारीनं आपल्याला आठवण करून दिली आहे की आरोग्य व अर्थव्यवस्था अविभाज्य भाग आहेत,” असं टेड्रोस म्हणाले.

“जागतिक आरोग्य संघटना सर्व देशासंह त्यांच्या अर्थव्यवस्था, संस्था, शाळा व व्यवसाय सुरक्षितपणे उघडण्याच्या नव्या टप्प्यात जाण्यास कटिबद्ध आहे. हे करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा यात सहभाग असणं गरजेचं आहे. स्थानिक पातळीवरील जोखीम लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, समुदायानं आणि देशांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत,” असंही टेड्रोस म्हणाले.

 

News English Summary: Tedros Gaberius, director general of the World Health Organization, commented on the situation after the vaccine was introduced. “The vaccine is going to be an important tool to prevent the spread of corona, but it will not end coronary heart disease,” said Gaberius.

News English Title: Vaccine will not end pandemic on its own or restore old normal who News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x