16 April 2025 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

भारताला धडा शिकवणार, पाकिस्तानचं लष्कर सज्ज; इम्रान खानकडून संताप

PM Imran Khan, Pakistan PM Imran Khan, WAR, India, Article 370, Jammu Kashmir

इस्लामाबादः पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान पोहोचले असून, त्यांनी तिथल्या संसदेला संबोधितही केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.

आरएसएसची विचारधारा महाभयंकर आहे हे जगाला ठाऊक नाही. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री काय म्हणतात? मुस्लीम महिलांना कबरीतून बाहेर काढून बलात्कार करु. मुख्यमंत्रीपदी बसणारा माणूस असं वक्तव्य कसं काय करु शकतो? काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर महिलांबाबत कशी वक्तव्यं समोर येत आहेत ते पाहा म्हणजे यांचे विचार किती सडके आहेत हे लक्षात आहे. भारत सहिष्णू देश समजला जात होता, मात्र सध्या जी विचारधारा आणि जे सरकार सत्तेत आहे त्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे भारताचं होणार आहे असंही इम्रान खान म्हणतं आहे. मोदी सरकारने घटना संपवली, सुप्रीम कोर्टाचा अपमान केला. त्यामुळे भारत आता अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.

काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचे पाकिस्तानचे सर्व प्रयत्न फसले आहेत. पाकला एकही देशाने उघडपणे पाठिंबा दिला नाही. पाकचा खास मित्र असलेल्या चीन आणि सौदी अरेबियानेही उघडपणे पाठिंबा व्यक्त केला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडलाय. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर थयथयाट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय. काश्मीरचा प्रश्न चिघळण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या