18 January 2025 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरीच्या चुकीने डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स उघड

White House, Press Secretary, Mistakenly Reveals, Trumps Bank Details

वॉशिंग्टन, २३ मे: व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींची एक चूक झाली आणि सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स समजले. करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या वातावरणात आता ट्रम्प यांच्या नावाची चर्चा पुन्हा होते आहे. कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी करोनासंबंधीची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सांगून टाकले. ही चूक त्यांच्याकडून अनावधानाने झाली.

मॅकएनानी यांनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं तीन महिन्यांचं वेतन अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिलं आहे. यासंदर्भातच एक लाख डॉलरचा चेक साईन करण्यात आला होता. हा चेक दाखवताना मॅकएनानी यांनी चुकून ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा सोळा लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर ट्रम्प सरकारच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांवरच राग काढला. ट्रम्प हे त्यांचं तीन महिन्यांचं वेतन हे करोनाशी लढण्यासाठी देत आहेत. ही बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा त्यांचे बँक डिटेल्स सगळ्यांना समजले यालाच महत्त्व दिलं जातं आहे या गोष्टीला काय अर्थ आहे? असाही प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

News English Summary: The White House press secretary mistakenly shared Donald Trump’s bank details with the world. White House Press Secretary Kelly McNaney shared Donald Trump’s bank details with Corona.

News English Title: White House Press Secretary Mistakenly Reveals Trumps Bank Details News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x