18 January 2025 6:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही | WHO'चं शुभं वक्तव्य

WHO, World Health Organization, Corona Vaccine

जिनिव्हा, ५ डिसेंबर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. तर कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश झाला आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.

भारतात मानवी चाचणीदरम्यान सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीचे दुष्परिणाम झाल्याचा दावा एका 40 वर्षीय तरुणानं करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र सीरमनं या संदर्भात परिपत्रक काढून या व्यक्तीनं केलेले दावे खोटे असल्याचं सांगत त्याच्यावर 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे ब्रिटनमधील नागरिकांना ही लस देण्यात आल्यानंतर जर मोठे दुष्परिणाम आढळून आले तर त्याची नुकसान भरपाई ब्रिटन सरकारकडून केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून संपूर्ण जगाला आनंद देणारं वक्तव्य अनेक महिन्यांनी आलं आहे. कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांन केलं आहे. अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरु आहे. काही ठिकाणी लसी तिसऱ्या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण करोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं असलं तरीही जे प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस हे या सभेत असं म्हणाले की “करोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे विसरुन चालणार नाही. “

 

News English Summary: World Health Organization (WHO) Director-General Tendros Andhonam Ghebreyes says the world has no problem dreaming of an end to the Corona epidemic. Work on vaccines is underway in many countries. In some places vaccines are even in the third stage. According to Tendros Andhonam Ghebreysus, the results show that the Corona epidemic is over. He made the statement at the UN General Assembly. However, he said that rich and advanced countries should not keep poor and backward countries in the hope of vaccination.

News English Title: World can start to dream about end of the Pandemic who on covid19 Vaccine Results News Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x