25 December 2024 11:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

पुढील २ आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील - WHO

WHO, World Health Organization, Corona Virus

जिनिव्हा, १६ जून: जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. मात्र आता ही परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. कारण पुढील दोन आठवडे दररोज १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मागील १५ दिवसांत अशीच परिस्थिती दिसून आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांच्या म्हणण्यानुसार, ५० दिवसांनी चीनमध्ये पुन्हा एकदा बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये नव्याने ९० हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीनला काही मदत लागल्यास या संघटनेचे एक पथक तिथे जाणार आहे. सध्या दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचे थैमान कायम राहणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ होताना दिसत आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. आजही १० हजार ६६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख ४३ हजार ९१’वर पोहचला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या १ लाख ५३ हजार १७८ सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

 

News English Summary: Corona thaman continues around the world. But now the situation is getting worse. The World Health Organization (WHO) has warned that more than one million coronavirus patients will be diagnosed every day for the next two weeks. A similar situation has emerged in the last 15 days.

News English Title: World Health Organisation has warned that more than one million coronavirus patients will be diagnosed every day for the next two weeks News latest Updates.

 

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x