17 April 2025 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

कोरोना हवेतून पसरतोय, WHO ची कबुली | व्हायरस एरोसोलच्या माध्यमातून दूरपर्यंत पसरतोय

Corona Pandemic

वॉशिंग्टन, ०८ मे | जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला आहे. कारण आतापर्यंत यावर वेगवेगळे दावे करण्यात आले असून कोणीही याबाबत ठोस पुरावा दिला नव्हता.

डब्ल्यूएचओने नुकतेच कोरोना व्हायरसवर नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, कोरोना व्हायरस हे खराब वायुजीवन, लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी फैलण्याचा धोका जास्त असतो. कारण अशा ठिकाणी व्हायरस एरोसोलच्या माध्‍यमातून खूप दूरपर्यंत जात असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या गाइडलाइनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे डब्ल्यूएचओने आतापर्यंत कोरोना व्हायरस हवेतून पसरतो याचा पुरावा नसल्याचे सांगितलेले होते.

WHO मार्गदर्शकतत्त्वातील बदल?

  1. कोरोना विषाणू हे हवेतून एक मीटर किंवा सहा फूटापेंक्षा जास्त दूर जाऊ शकतो, असे आता जगभरात गृहित धरले जाईल.
  2. एरोसोलद्वारे कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा संशय आल्यानंतर कोरोना टाळण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जोडली जाऊ शकतात.
  3. विशेषतः कार्यालय, घर, शाळा-महाविद्यालय आणि मॉलसारख्या बंद असलेल्या ठिकाणी नवीन सल्ला दिला जाऊ शकतो.
  4. भारतातील कोविड 19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्हीके पॉल यांनी अलीकडेच घरातदेखील मास्क घालण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला डब्ल्यूएचओच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाशी सुसंगत आहे.
  5. सोसायटी किंवा निवासी अपार्टमेंटमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे प्रकरण का आढळत आहे हे यावरुन समजून येईल.

 

News English Summary: It has been more than a year since the Corona epidemic hit the world. Various experts are studying how the corona epidemic came about. Against this background, the World Health Organization has claimed that the corona virus can be spread through the air. Because so far there have been various claims and no one has given concrete evidence.

News English Title: World health organization guidelines over corona virus spread through air news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या