महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | IPL 2020 | कार्तिकचा भन्नाट कॅच पाहिलात का
आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. कोलकात्याने राजस्थानवर 60 रनने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने घेतलेला अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 35 वर्षांचा असलेल्या दिनेश कार्तिकने एखाद्या तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच पकडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा
Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला | आणि संतापला
IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेल (Chris Gayle) ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | विकेटच मिळत नाही | कंटाळलेल्या विराटची सूर्यकुमारला टशन
सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून क्विंटन डिकॉक आणि इशान किशन ओपनिंगला बॅटिंगसाठी आले. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादवने मात्र एकहाती किल्ला लढवत मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्या (Suryakumar Yadav) ने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. बँगलोरकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस मॉरिसने 1 विकेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दिल्ली कपिटल्सवर दणदणीत विजय | त्यात वॉर्नरचा वाढदिवस | धमाल
सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील एकतर्फी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ८८ धावांनी विजय झाला. सनरायजर्स हैदराबादच्या राशीद खानने ४ ओव्हरमध्ये ७ रन देत ३ विकेट घेतल्या तर संदीप शर्मा आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शाबाझ नदीम, विजय शंकर आणि जेसन होल्डरने प्रत्येकी १ विकेट घेतली. (IPL MATCH 47 SRH vs DC Sunrisers Hyderabad won by 88 runs)
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 KKR vs DC Live | दिल्लीचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय
आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्लेऑफ फेरीच्या दृष्टीने आता स्पर्धेत रंगत आली आहे. प्लेऑफसाठीचे पहिले 3 संघ जवळपास निश्चित झाले आहेत. तर 4 थ्या जागेसाठी 4 टीममध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. दरम्यान आज (24 ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामने खेळण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला आणि स्पर्धेतील 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही मॅच अबुधाबीत खेळली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 Live | CSK Vs MI | चेन्नईसाठी हा सामना करो या मरो
(IPL 2020) 13व्या मोसमातील 41 वा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईसाठी विजय अत्यावश्यक असणार आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तर, चेन्नई या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना ‘करो या मरोचा’ असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आणि फिंचने दिलेली शिवी स्टम्प माइकमध्ये कैद झाली
शारजाह येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. मात्र सामन्यात अशी एक गोष्ट घडली, जी चाहत्यांच्या नजरेतून दडली नाही. सामन्यादरम्यान बेंगलोरचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने कोलकाताच्या आंद्रे रसेलला शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 82 धावांनी पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरलेला आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या खेळीदरम्यान त्याने मैदानाबाहेर एक षटकार मारला आणि चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | विराट - डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील २८वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) झाला. शारजाहच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच्या फलंदाजी जोडीने शानदार भागीदारी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट | नेटिझन्सला दिली 'ट्रोल' संधी
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 2 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला 20 षटकांत केवळ 119 धावा करता आल्या. या सामन्यात कोलकाताचा युवा सलामीवीर शुबमन गिल काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 25 चेंडूत 34 धावा केल्या.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार
आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही दिग्गज फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टी20 चा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड यांच्यासारखे दिग्गज जास्तीत जास्त षटकार मारण्याच्या शर्यतीत मागे पडले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारले आहेत ते आपण पाहूया.
4 वर्षांपूर्वी -
ख्रिस गेलची इस्पितळात सुद्धा पब स्टाईल मज्जा | पोस्ट टाकत म्हणाला...
किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याता आहे. गेलचा हॉस्पिटलमधला एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मी लढल्याशिवाय हरणार नाही, असेही गेलने यावेळी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धची मॅच ३४ धावांनी जिंकली. याआधी मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ७ बाद १७४ धावा केल्या.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी
मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजीआबुधाबी, IPL 2020: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आज आयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की आरसीबीचा संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020: सनरायझर्स हैदराबादला धक्का | अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | RR vs CSK | राजस्थानला धक्का | संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 उद्घाटन सोहळा | 'या' ५ गोष्टी यंदा दिसणार नाहीत
इंडीयन प्रिमियर लीगच्या १३ व्या सिझनला आजपासून सुरुवात होतेय. मागच्या वेळचे विजेते मुंबई इंडीयन्स आणि गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणारेय. टॉस उडताच १३ व्या सिझनची रणधुमाळी सुरु होईल. सर्व टीम्सनी साधारण महिन्याभर यूएईमध्ये सराव केलाय. कोरोना संकटात हा सोहळा होणं मोठी गोष्ट मानली जातेय. असे असले तरी यावर्षी प्रेक्षकांना काही गोष्टींना मुकावं लागणार आहे. पहिली मॅच होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
फुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार
शनिवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून IPL 2020 आयपीएल या क्रिकेट स्पर्धेला पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळं यंदाच्या वर्षी काही महिने उशिरानं का असेना, पण आयपीएलचं नवं पर्व सुरु होणार आहे. त्यासोबतच सुरुवात होणार आहे ती म्हणजे सट्टाबाजाराला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC