22 February 2025 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

VIDEO | आणि फिंचने दिलेली शिवी स्टम्प माइकमध्ये कैद झाली

Aaron Finch,  abused Andre Russell, IPL 2020

शारजाह , १४ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.

शारजाह येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. मात्र सामन्यात अशी एक गोष्ट घडली, जी चाहत्यांच्या नजरेतून दडली नाही. सामन्यादरम्यान बेंगलोरचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने कोलकाताच्या आंद्रे रसेलला शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे फिंच आणि देवदत्त पडिक्कल सलामीला फलंदाजासाठी मैदानावर उतरले. फिंचने ३७ चेंडूत ४७ धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान डावातील सहावे षटक टाकण्यासाठी रसेल आला. त्याने षटकातील चौथा चेंडू स्लो लेंथने टाकला. त्यावर फिंचला पुल शॉट मारायचा होता. पण चेंडूची गती कमी असल्यामुळे फिंचला तो चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही.

त्यानंतर त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्या तोंडून अपशब्द निघाले. पण रसेलने त्यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र फिंचचा आवाज स्टम्प माइकमध्ये कैद झाला होता, जो नंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

 

News English Summary: Royal Challengers Bangalore beat Kolkata Knight Riders by 82 runs in Sharjah. But something happened in the match, which did not go unnoticed by the fans. During the match, Bangalore opener Aaron Finch insulted Kolkata’s Andre Russell. His video is going viral on social media.

News English Title: Aaron Finch abused Andre Russell during the match News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x