18 January 2025 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

BREAKING | ख्रिस गेलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह | IPL'मध्ये खेळणे तळ्यात मळ्यात

Cricket, Dream11 IPL 2020, Kings XI Punjab, Chris Gayle, corona test negative

जमैका, 25 ऑगस्ट : जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला करोनाची बाधा झाली आहे. बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला करोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे.

धक्कादायक म्हणजे या पार्टीची धग आता आयपीएललाही बसणार असून क्रिकेटर ख्रिस गेल (Chris Gayle) या पार्टीला हजर होता. उसेन बोल्टच्या पार्टीला फुटबॉलर रहीम स्टर्लिंग आणि लियॉन बैली देखील आले होते. याशिवाय अन्य बड्या हस्तीदेखील उपस्थित होत्या. बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बोल्ट याच्या 34 व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल झाले होते. या पार्टीमध्ये आलेले पाहुणे सोशल डिस्टंसिंग सोडा मास्क न लावता नाचत-गात होते. बोल्टने पार्टीनंतर ‘बेस्ट बर्थडे एव्हर’ असे ट्वीटही केले होते.

बोल्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेलने कॅरेबिअन प्रीमियर लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयपीएलमध्ये गेल किंग्स इलेव्हन पंजाबचा महत्वाचा खेळाडू आहे. यामुळे कोरोनामुळे त्याच्या संघातील समावेश किंवा स्पर्धेतील खेळण्यावर प्रश्नचिन्ह लागले होते. गेलची पहिली चाचणी निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असून गेलची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

 

News English Summary: If Gayle was tested positive for the novel coronavirus, his chances of travelling to UAE to play for Kings XI Punjab would have been compromised. But, the swashbackling batsman took to social media to announce that he has been tested negative twice.

News English Title: Cricket Dream11 IPL 2020 big blow kings XI Chris Gayles corona test negative says sorry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x