IPL 2020 उद्घाटन सोहळा | 'या' ५ गोष्टी यंदा दिसणार नाहीत
अबुधाबी, १९ सप्टेंबर : इंडीयन प्रिमियर लीगच्या १३ व्या सिझनला आजपासून सुरुवात होतेय. मागच्या वेळचे विजेते मुंबई इंडीयन्स आणि गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणारेय. टॉस उडताच १३ व्या सिझनची रणधुमाळी सुरु होईल. सर्व टीम्सनी साधारण महिन्याभर यूएईमध्ये सराव केलाय. कोरोना संकटात हा सोहळा होणं मोठी गोष्ट मानली जातेय. असे असले तरी यावर्षी प्रेक्षकांना काही गोष्टींना मुकावं लागणार आहे. पहिली मॅच होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घेऊया.
उद्घाटन सोहळा रद्द:
आयपीएल १२ व्या सीझनप्रमाणे यावेळेसही उद्घाटन समारंभ होणार नाही. यावेळेस कारण बदलले आहे. गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. म्हणून उद्घाटन सोहळा झाला नव्हता. या सर्व खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या परिवाराला देण्यात आली. यावेळेस कोरोनामुळे उद्घाटन सोहळा रद्द झालाय.
चिअर लिडर्स:
आयपीएल सुरु झाली आणि मैदानात खेळाडुंसोबत चिअर्स लीडर्स दिसल्या नाहीत असं झालं नव्हतं. जेवढा आनंद प्रेक्षक बॉलर्स, बॅट्समन, फिल्डर्सचा घेतात तेवढाच आनंद चीअर लीडर्सचा डान्स पाहुनही होत असतो. पण यावेळेस चीअर लीडर्सना देखील बाय बाय करण्यात आलंय. मैदानात कमी कमी उपस्थितीवर लक्ष देण्यात आलंय. त्यामुळे पहिल्यांदाच आयपीएल चीअर लीडर्सच्या अनुपस्थित होतायत.
प्रेक्षक नाहीत:
आयपीएलच्या मैदानात पहील्यांदाच प्रेक्षकांच्या जागा रिकाम्या दिसतील. बॅट्समननी सिक्सर मारल्यावर कोणता प्रेक्षक चेंडूचा झेल घेताना दिसणार नाही. तसेच कॉमेंट्री देखील स्टेडीयममध्ये नव्हे तर स्टुडीओत बसून केली जाणार आहे.
टेक्निकल स्टाफ:
टीमचा टेक्निकल स्टाफ, व्हिडीओ एनालिस्टची टीम ड्रेसिंग रुममध्ये नसेल. त्यांना प्रेक्षक स्टॅण्डमध्ये वेगळी जागा शोधावी लागेल. खेळाडुंशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी रणनीती आखली जातेय. टीम्सना वेगळी वॉर रुम असणार आहे.
मीडियाला नो एन्ट्री:
यावेळी आयपीएलमध्ये किंवा सरावादरम्यान मीडियाला देखील एन्ट्री नसणार. मीडिया आणि खेळाडू एकमेकांना समोरासमोर भेटू शकणार नाहीत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखती होतील. खेळाडू स्वत: येतील की व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगनेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील हे अजून स्पष्ट नाहीय.
दरम्यान, सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला आल्यानं चाहते आनंदात असतील, परंतु त्यांच्यासाठी ही गोष्ट चिंता वाढवणारी ठरू शकते. त्यात संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नसल्यानं कर्णधार रोहित शर्माचं टेंशन आणखीन वाढलं आहे. मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे.
News English Summary: The 13th season of the Indian Premier League begins today. The first match will be between defending champions Mumbai Indians and defending champions Chennai Super Kings. The 13th season will begin with the toss. All the teams practiced in the UAE for about a month. The ceremony is considered a big event in the Corona crisis. Even so, owning one is still beyond the reach of the average person. Let’s learn these 5 things before the first match.
News English Title: Five things missing this edition including opening ceremony Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC