24 December 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

VIDEO | ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला | आणि संतापला

IPL 2020, Video Watch, furious Chris Gayle, IPL 2020

अबुधाबी, ३१ ऑक्टोबर: IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेल (Chris Gayle) ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हनची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये मनदीप सिंग बाद झाला. त्यानंतर गेल आणि कर्णधार केएल राहुलने शतकी भागिदारी केली. गेलने पहिल्या चेंडूपासून राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १९व्या षटकात जोफ्रा आर्चरने गेलची विकेट घेतली. तो ९९ धावांवर असताना बोल्ड झाला. विकेट गेल्यानंतर गेलने रागात बॅट जोरात फेकून दिली. यासाठी त्याला दंड करण्यात आला आहे. आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल गेलला मॅच फीच्या १० टक्के दंड करण्यात आला आहे. गेलने आयपीएलच्या आचार संहिता कलम १ चे उल्लंघन केल्याने हा दंड करण्यात आला.

आऊट झाल्यानंतर क्रिस गेल थोडा संतापलेलाही पाहायला मिळाला, त्याने बॅट मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिली. पण पॅव्हेलियनमध्ये परतताना आर्चरने गेलसोबत हात मिळवला. आर्चरने हा फोटो ट्विट केला आहे आणि गेल अजूनही बॉस असल्याचं आर्चर या ट्विटमध्ये म्हणाला आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये केलेल्या शानदार बॉलिंगमुळे आर्चरने राजस्थान (Rajasthan Royals) चे प्ले-ऑफचं स्वप्न अजून कायम ठेवलं आहे.

दरम्यान, इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) हा त्याच्या ट्विटर अकाऊंटमुळे कायमच चर्चेत असतो. आतापर्यंत अनेकवेळा जोफ्रा आर्चरने भूतकाळात वर्तवलेली भविष्य काही वर्षानंतर खरी ठरत असल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. कोणत्याही मॅचनंतर जोफ्रा आर्चरची जुनी ट्विट त्याचे चाहते व्हायरल करतात आणि सध्याच्या घटनेला ती जोडली जातात. शुक्रवारी आयपीएल (IPL 2020)मध्ये पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचनंतरही आर्चरचं 7 वर्ष जुनं ट्विट व्हायरल झालं आहे.

 

News English Summary: Chris Gayle is one of those few players who rarely lose their cool on the cricket field. The veteran batsman is always seen with a smile on his face. However, the disappointment of missing out on a well-deserved century was perhaps too much even for the Universe Boss as the West Indies legend reacted furiously to it on Friday. The Kings XI Punjab batsman missed his well-deserved century by just one run against Rajasthan Royals and did not shy away from venting his frustration. The southpaw, who also became the first batsman to hit 1,000 sixes earlier during his knock, was out on 99 off 63 balls. His stunning knock was studded with six fours and eight maximums.

News English Title: IPL 2020 Video Watch furious Chris Gayle loses cool throws away bat in anger missing century News updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x