22 December 2024 1:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

IPL 2020 | यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार

Dream11 IPL 2020, Most sixes, cricket updates

अबुधाबी, १३ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही दिग्गज फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टी20 चा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड यांच्यासारखे दिग्गज जास्तीत जास्त षटकार मारण्याच्या शर्यतीत मागे पडले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारले आहेत ते आपण पाहूया.

सर्वाधिक षटकारांच्या शर्यतीत या वेळी किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पूरन आहे. त्याने आतापर्यंत 16 षटकार ठोकले आहेत. परंतु वाईट बाब म्हणजे त्याच्या संघाला या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही.

राजस्थानचा सलामीवीर संजू सॅमसन या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. सुरुवातीच्या सामन्यात धावांचा वर्षाव करणाऱ्या सॅमसनने आतापर्यंत 16 षटकार ठोकले आहेत. राजस्थानला विजय मिळवून देणारा अष्टपैलू राहुल तेवतियानेही आतापर्यंत 15 षटकार ठोकले आहेत. त्याने पंजाबविरुद्ध एका षटकात पाच षटकारही ठोकले आहेत.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत 14 षटकार ठोकले आहेत. मॅरेथॉन डाव खेळणारा रोहित कोणत्याही सामन्यात कोणत्याही क्षणी षटकारांचा वर्षाव करू शकतो. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत मुंबईचा युवा फलंदाज ईशान किशनही रोहितसह संयुक्तरीत्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 5 डावांमध्ये 14 षटकार ठोकले आहेत.

 

News English Summary: The 13th season of the IPL 2020 has seen some tough matches so far. We have seen the picture of the match change with just one six. It has rained sixes this season too. Some of the veteran batsmen in international cricket are known for playing big shots. But this season, veterans like Mumbai skipper Rohit Sharma and T20 star batsman Kieran Pollard have fallen behind in the race to hit maximum sixes. Let’s see which batsman has hit the most sixes in the IPL so far.

News English Title: IPL 2020 most sixes cricket updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x