18 April 2025 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

IPL 2020 | मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय

Mumbai Indians, Sunrisers Hyderabad, IPL 2020 cricket match, Sports articles

शारजा, ४ ऑक्टोबर : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धची मॅच ३४ धावांनी जिंकली. याआधी मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ७ बाद १७४ धावा केल्या.

सनरायजर्स हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६० धावा केल्या. सलामीला आलेल्या वॉर्नरने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारत ६० धावा केल्या. जेम्स पॅटिसनच्या चेंडूवर इशान किशनने वॉर्नरचा शानदार झेल घेतला. दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टो २५ धावा करुन सर्वात आधी बाद झाला. नंतर मनीष पांडे ३० धावा, केन विल्यमसन ३ धावा, प्रियम गर्ग ८ धावा, अब्दुल समद २० धावा, अभिषेक शर्मा १० धावा एवढे योगदान देऊ शकले. राशिद खान ३ धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिसन आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी २ तर कृणाल पांड्याने १ विकेट घेतली.

मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर कृणाल पांड्याला 1 विकेट मिळाली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 60 रनची खेळी केली.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 208 रनपर्यंत मजल मारली. क्विंटन डिकॉकने 39 बॉलमध्ये 67 रन केले. पांड्या बंधू आणि पोलार्डने मुंबईला 200च्या पुढे नेण्यात मदत केली. कृणाल पांड्याने 4 बॉलमध्येच 500 च्या स्ट्राईक रेटने 20 रन काढले. तर पोलार्डने 13 बॉलमध्ये 25 आणि हार्दिक पांड्याने 19 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली.

 

News English Summary: IPL 2020 Highlights, Mumbai Indians (MI) vs Sunrisers Hyderabad (SRH): Fast bowlers Trent Boult, James Pattinson and Jasprit Bumrah picked up two wickets each, helping Mumbai Indians beat Sunrisers Hyderabad by 34 runs in Match No. 17 of the 2020 IPL at the Sharjah Cricket Ground on Sunday. David Warner scored 60 off 44 balls but barring him no other batsmen could cross 30.

News English Title: IPL 2020 Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad cricket match sports article news.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या