23 February 2025 2:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

IPL 2020: सनरायझर्स हैदराबादला धक्का | अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर

Dream11 IPL 2020, Sunrisers Hyderabad, Mumbai Indian, Mitchell Marsh, Marathi News ABP Maza

अबुधाबी, २३ सप्टेंबर : पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या घसरगुंडीची अधिक चर्चा झाली. आरसीबीने सामना जिंकण्यापेक्षा हैदराबादने त्यांना विजय बहाल केला असेच चाहते म्हणत आहेत. या सामन्यात हैदराबादला मोठा धक्का बसला तो स्टार अष्टपैलू मिशेल मार्शच्या दुखापतीचा. गोलंदाजी करताना पायाची टाच दुखावल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. मात्र आता मार्शची दुखापत अत्यंत गंभीर असल्याची माहिती हैदराबाद संघाच्या सूत्राकडून मिळाली आहे. यामुळे आता त्याला आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांतही खेळता येणार नाही.

 

News English Summary: Mitchell Marsh has become the first player to be ruled out of IPL 2020 because of injury, and West Indies allrounder Jason Holder has been named as his replacement at the Sunrisers Hyderabad. Marsh hurt his right ankle during the Sunrisers’ first match of the tournament, on September 21 against the Royal Challengers Bangalore. This is the second time in the last five years that Marsh has had to abort the tournament because of injury – in 2017, a shoulder problem cost him the entire IPL season for the Rising Pune Supergiants.

News English Title: Sunrisers Hyderabad All rounder Mitchell Marsh Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x