26 April 2025 12:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवण्याची संधी, तपशील जाणून घ्या

DCX System IPO

DCX Systems IPO | तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाईची संधी शोधत असाल तर दिवाळीनंतर तुम्हाला एका जबरदस्त IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. बेंगळुरू स्थित DCX सिस्टीम कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येईल. IPO चा इश्यू आकार 500 कोटी रुपये असेल. DCX कंपनीने IPO मध्ये 197 ते 207 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केला आहे.

IPO चा आकार 500 कोटी :
केबल्स आणि वायर हार्नेस असेंब्ली मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी DCX सिस्टम्सने IPO द्वारे बाजारातून 500 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे. या IPO मध्ये नवे शेअर्स इश्यू करून 400 कोटी रुपये जमा केले जातील, 100 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेल मध्ये विक्री करण्यात येईल. कंपनीचे प्रमोटर्स NCBG होल्डिंग्स इंक आणि VNG टेक्नॉलॉजी ऑफर फॉर सेलमधे त्यांचे स्टेक विकणार आहेत.

किमान गुंतवणूक :
DCX Systems IPO मध्ये एका लॉट साइजमध्ये शेअर्सची संख्या 72 निश्चित करण्यात आली आहे. या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,904 रुपये गुंतवावे लागतील. IPO मध्ये तुम्ही कमाल गुंतवणूक मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

IPO मध्ये राखीव कोटा :
DCX Systems च्या IPO मध्ये 75 टक्के कोटा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के कोटा राखीव असेल, आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव असेल.

IPO मधील पैशाचा वापर :
DCX Systems IPO मधून कंपनी जो फंड जमा करेल, ती रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल. या IPO फंडमधून कंपनी आपली खेळत्या भांडवलाची गरजही पूर्ण करेल. याशिवाय IPO चा फंड उपकंपनी रॅनियल अॅडव्हान्स सिस्टीममधील गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि त्याचा भांडवली खर्च पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. सामान्य कॉर्पोरेट आवश्यकता पूर्ण करण्यासाठीही IPO फंड वापरला जाणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
2019-20 मध्ये DCX Systems ने 449 कोटी रुपयेचा महसूल कमावला होता, जो आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 56.64 टक्क्यांनी वाढून 1102 कोटी रुपयेवर आला आहे. मार्च 2020 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 1941 कोटी रुपयेची ऑर्डर जोडण्यात आली होती, जी 31 मार्च 2022 पर्यंत वाढून 2369 कोटी रुपयेपर्यंत गेली आहे. एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस, अॅक्सिस कॅपिटल आणि सेफ्रॉन कॅपिटल यांना IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. हा IPO BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX System IPO will be open for investment 22 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

DCX System IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या