16 April 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

IPO Investment | हर्षा इंजिनियर्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांची लॉटरी लागण्याचे संकेत, ग्रे मार्केटमध्ये 70 टक्के प्रीमियम वर पोहोचला

IPO Investment

IPO Investment | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेडचा IPO 14 सप्टेंबरपासून सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. गुंतवणूकदार या IPO मध्ये ठरलेल्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. HEIL च्या IPO ची किंमत 314 रुपये ते 330 रुपये प्रति इक्विटी शेअर ठरवण्यात आली आहे. या IPO चे पहिल्याच दिवशी एकूण 2.87 पट शेअर्स सबस्क्राइब केले गेले. हर्षा इंजिनिअर कंपनीच्या IPO मध्ये तुम्ही किमान 14,850 रुपये गुंतवणूक करू शकता. BSE वेबसाइटनुसार, IPO च्या एका लॉट मध्ये 45 शेअर्स असतील. म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार किमान 45, शेअर्ससाठी बोली लावू शकतात. ह्या IPO मधे गुंतवणूकदाराला किमान 14,850 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी, एक गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट खरेदी करू शकतो.यासाठी गुंतवणूकदार कमाल 1,93,050 रुपये गुंतवून तेरा लॉट विकत घेऊ शकतात.

70% परतावा मिळण्याचा अंदाज : 14 सप्टेंबर रोजी कंपनीचा IPO उघडण्यापूर्वीच, हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 70 टक्के च्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. ग्रे मार्केट मध्ये प्रति शेअरची किंमत 210 रुपयेवर पोहोचली होती. जर आपण ग्रे मार्केट प्राइसचे निरीक्षण केले तर, 330 रुपयांच्या ऑफर प्राईसच्या तुलनेत, स्टॉक 26 सप्टेंबर रोजी 540 रुपयांच्या प्रीमियमसह सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच स्टॉकची लिस्टिंग जवळपास 70 टक्के प्रीमियम होऊ शकते.

IPO बाबत तज्ञांचे मत :
तज्ञांचे असे मत आहे की, गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये पैसे गुंतवले पाहिजे. GMP नुसार या IPO मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करावी, असे अनेक बाजारतज्ज्ञांचे आणि प्रसिद्ध गुंतवणूकदारांचे ही मत आहे.

कंपनी बद्दल सविस्तर:
IPO इश्यूमधून कंपनी 755 कोटी रुपयेचा फंड उभारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हर्ष इंजिनियर्सच्या IPO चा पब्लिक इश्यू कोटा 755 कोटी रुपये म्हणजेच 1,72,12,410 शेअर्सचा आहे. यामध्ये 455 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 300 कोटी रुपयांच्या ऑफर-फॉर-सेल यांचा समावेश होतो. या IPO मध्ये 35 टक्के चा कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. कंपनीच्या IPO इश्यूपैकी 50 टक्के कोटा सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. याशिवाय, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा आणि उर्वरित 15 टक्के कोटा हा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध केले जातील.

हर्षा इंजिनियर्स कंपनीचा व्यवसाय :
हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेड एव्हिएशन आणि एरोस्पेस, रेल्वे, ऑटोमोटिव्ह, अक्षय ऊर्जा, कृषी आणि इतर उद्योगांसाठी अभियांत्रिकी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन, विक्री आणि विपणन करते. ही कंपनी बांधकाम खाण क्षेत्रात अभियांत्रिकी उत्पादने आणि सेवा सुविधा देखील प्रदान करते.

IPO मधून पैसे उभे करून कंपनी काय करेल?
कंपनी फ्रेश IPO इश्यूच्या रकमेतील 270 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. 76 कोटींची मशिनरी खरेदी करण्याचा विचारही कंपनी करत आहे. याशिवाय 7.12 कोटी रुपये कंपनी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी खर्च करणार आहे. यापूर्वी कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये SEBI म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट पेपर सबमिट केला होता. कंपनीकडे 5 उत्पादन सुविधा केंद्र उपलब्ध आहेत. त्यापैकी गुजरातमधील अहमदाबाद जवळ असलेल्या चांगोदर येथे आणि मोरैया येथे दोन प्रमुख उत्पादन सुविधा केंद्र उपलब्ध आहेत. याशिवाय, रोमानियातील चांगशू, चीन आणि घिंबव ब्रासोव्ह या ठिकाणीही कंपनीने प्रत्येकी एक उत्पादन युनिट सुरू केले आहे.

2022 साली हर्ष इंजिनियर्सचा एकूण महसूल 51.24 टक्के वाढला होता. आर्थिक वर्ष 2022 साठी कंपनीने एकूण 1,321.48 कोटी रुपये महसूल कमावला आहे, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये फक्त 873.75 कोटी रुपये होता. PAT म्हणजेच कर कपाती नंतरचा एकूण नफा आर्थिक वर्ष 2021 मध्ये 45.44 कोटी रुपये होता, जो 2022 मध्ये दुप्पट झाला आणि सुमारे 91.94 कोटी रुपये पर्यंत गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Harsha Engineering share price return in gray market on 16 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या