महत्वाच्या बातम्या
-
Kaynes Technology IPO | केन्स टेक्नॉलॉजीचा आयपीओ फॉर्मात, किती सबस्क्राइब आणि किती GMP चेक करा
Kaynes Technology IPO| आतापर्यंत Kaynes Technology इंडिया कंपनीच्या IPO चे 34.16 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले आहे. NSE निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, या कंपनीच्या IPO ला जारी करण्यात आलेल्या 1.04 कोटी शेअर्सच्या तुलनेत 35.76 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. या IPO अंतर्गत, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 98.47 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 21.21 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 4.09 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | ग्रे मार्केटमधून संकेत मिळाले, या आयपीओ गुंतवणूकदारांची लॉटरी लागणार, स्टॉकची GMP तेजीत
IPO investment | Kaynes Technology इंडिया कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी या Kaynes Technology कंपनीचा IPO 1.10 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. Kaynes Technology कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 559-587 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. IPO ला ग्रे मार्केटमध्ये मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून शेअर प्रिमियम किमतीवर लिस्ट होऊ शकतात असा अंदाज व्यक्त येत आहे. ग्रे मार्केटमध्ये Kaynes Technology कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 115 रुपयांपर्यंत गेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | या IPO चा चमत्कार, 40 रुपयेच्या या शेअरने दिला 325 टक्के परतावा, पैसे 4 पट वाढले, स्टॉक खरेदी करणार?
Money From IPO | 14 डिसेंबर 2017 रोजी Dynamic cables ही कंपनी BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीचा IPO प्राइस बँड 40 रुपये प्रति शेअर होता. पण लॉट साइजचा आकार 3000 शेअर्स इतका होता. म्हणजेच, डायनॅमिक केबल्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी किमान 1.20 लाख रुपये लावले असावेत. या कंपनीचे शेअर्स ज्या दिवशी सूचीबद्ध झाले त्या दिवशी गुंतवणूकदारांनी 20 टक्के परतावा कमावला होता. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारानी कंपनीचे शेअर्स IPO लिस्टिंग पासून आतापर्यंत धारण केले आहेत, त्यांची गुंतवणूक 4.25 पट अधिक वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Darwinbox IPO | युनिकॉर्न स्टार्टअप डार्विनबॉक्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा
Darwinbox IPO | एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेली एचआर टेक कंपनी डार्विनबॉक्स येत्या तीन वर्षांत इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) आणण्याची शक्यता आहे. कंपनीचे सहसंस्थापक रोहित चेन्नमनेनी यांनी सोमवारी ही माहिती दिली. २०२५ पर्यंत शहरातील कंपनीला नफा मिळण्याची अपेक्षा आहे,’ असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या डार्विनबॉक्सच्या प्रवर्तकांचा कंपनीत ३० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा गुंतवणूकदारांकडे आहे. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये टीसीव्ही, सेल्सफोर्स व्हेंचर्स, सेकोइया, लाइटस्पीड आणि एंडिया पार्टनर्सचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | आधीच दिसतंय कमाई होणार भाऊ! या IPO चा शेअर लिस्टिंगपूर्वीच 80 रुपयांच्या प्रीमियमवर, फायद्याचा शेअर कोणता?
IPO in Focus | Archean Chemicals इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग साठी गुंतवणूक करण्याची मुदत शुक्रवारी संपली. Archean Chemicals कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावलेले लोक आता शेअर्स वाटप होण्याची वाट पाहत आहेत. या IPO मध्ये शेअर्स वाटप करण्याची संभाव्य तारीख 16 नोव्हेंबर 2022 आहे. हा IPO 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO चा आकार 1462.31 कोटी रुपये होता, जो 32.23 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. या IPO मध्ये QIB साठी राखीव असलेला कोटा 48.91 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 9.96 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Keystone Realtors IPO | कीस्टोन रियल्टर्सचा आयपीओ उद्या उघडणार, गुंतवणुकीपूर्वी तपशील जाणून घ्या
Keystone Realtors IPO | रुस्तमजी ब्रँडअंतर्गत मालमत्तांची विक्री करणाऱ्या मुंबईतील कीस्टोन रियल्टर्स या कंपनीचा आयपीओ उद्या म्हणजे १४ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६३५ कोटी रुपये उभे करायचे आहेत. कीस्टोन रिअल्टर्सचे सीएमडी बोमन रुस्तम इराणी म्हणाले, “आमची कंपनी विश्वास आणि टीमवर्कवर आधारित आहे. रुस्तमजीला उच्च स्तरावर नेण्यासाठी आमच्या हुशार/मेहनती टीमला चांगले परिणाम मिळत राहतील, अशी मला आशा आहे,’ असे सांगून ते म्हणाले की, या आयपीओचा उद्देश सफल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी सकारात्मक आहे की लोकांना आमचे यश समजेल. दीर्घकाळात आम्ही उत्तम परतावा देऊ.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | IPO देत आहेत वेगाने पैसा, या शेअरच्या लिस्टिंगवेळीच गुंतवणुकदार मालामाल, पुढेही खरेदी करावा?
Money from IPO | DCX Systems कंपनीच्या शेअर्सनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर शानदार एंट्री केली आहे. IPO लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 289.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या स्टॉकची लिस्टिंग किंमत त्याच्या इश्यू किमतीच्या 39.66 टक्के अधिक होती. त्याच वेळी, एनएसईवर डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 287 रुपयांवर क्लोज झाली होती. इश्यू किमतीपेक्षा शेअरची किंमत 80 रुपयांनी अधिक वधारली होती.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | 1 दिवसात लॉटरी लागण्याचे संकेत, शेअरचा GMP 75 रुपये प्रीमियमवर, IPO बद्दल जाणून घ्या
Money From IPO | Archean Chemicals या स्पेशॅलिटी मरीन केमिकल निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाल्याच्या पहिल्या दिवशीच 30 टक्के सबस्क्राइब झाला आहे. या केमिकल कंपनीच्या आयपीओची मध्ये शेअरची किंमत 386-407 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. Archean Chemicals कंपनी IPO 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
DCX Systems Share Price | कडक! आयपीओनंतर शेअर लिस्ट झाल्याच्या पहिल्याच दिवशी 38% रिटर्न, खरेदी करणार?
DCX Systems Share Price | बेंगळुरू येथील केबल्स अँड वायर हार्नेस असेंब्लीज निर्मिती कंपनी डीसीएक्स सिस्टीम्स (डीसीएक्स सिस्टिम्स) चा आयपीओ आज म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात जोरदार लिस्ट करण्यात आला आहे. इश्यू प्राइसपेक्षा हा शेअर ३८ टक्के प्रीमियमवर लिस्टेड आहे. आयपीओसाठी वरच्या किंमतीचा बँड 207 रुपये होता, तर बीएसईवर तो 286 रुपये होता. म्हणजेच प्रत्येक शेअरमध्ये लिस्टिंग केल्यावर गुंतवणूकदारांनी ७९ रुपयांचा नफा कमावला आहे. आज शेअर बाजारातील तेजीचा फायदाही झाला आहे. लिस्टिंगवर जास्त रिटर्न मिळाल्यानंतर शेअर्स विकायचे की अधिक नफ्यासाठी राहायचे हा प्रश्न आहे.
2 वर्षांपूर्वी -
KFin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीजचा 2400 कोटीचा आयपीओ लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी
KFin Technologies IPO | वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म केएफइन टेक्नॉलॉजीजच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २४०० कोटी रुपये उभे करायचे आहेत. कंपनीने यावर्षी ३१ मार्च रोजी सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) या मसुद्यानुसार हा आयपीओ केवळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. ओएफएसचा एक भाग म्हणून, प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर फंड पीटीई लिमिटेड शेअर्सची विक्री करणार आहे. हे सर्व प्रवर्तक विकणाऱ्या भागधारकाकडे जाणार असल्याने या आयपीओतून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. सूत्रांनी सांगितले की सेबीने केफिन टेक्नॉलॉजीजच्या प्रारंभिक भागविक्रीला मान्यता दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kaynes Technology IPO | या आयपीओत दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्याचा प्रचंड फायदा, शेअरची प्राईस बँड जाणून घ्या
Kaynes Technology IPO | इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगची कामे करणाऱ्या कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड (केटीआयएल) या कंपनीचा आयपीओ आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. आयपीओच्या माध्यमातून ८५७.८२ कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 559-587 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. ब्रोकरेज हाऊस आनंद राठी यांनी या आयपीओची सदस्यता घेण्याचा सल्ला दिला आहे. नव्याने इक्विटी शेअर्स जारी करण्यासोबतच विक्रीसाठी ऑफरही देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | गौतम अदानींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये चर्चा, शेअरची प्राइज बँड पहा
IPO in Focus | Inox Green Energy Services Limited कंपनीचा IPO 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. INOX ग्रीन एनर्जी IPO 11 नोव्हेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या IPO मध्ये शेअर 61-65 रुपये प्रति शेअर या दराने जारी केले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | या दोन IPO मध्ये गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला, स्टॉक पुढे सुद्धा पैसा देतील, खरेदी करणार?
Money Making IPO | 14 कंपन्यांचे IPO ऑक्टोबर 2022 पर्यंत BSE निर्देशाकावर सूचीबद्ध झाले आहेत. यापैकी 9 कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग किंमतीच्या वर ट्रेड करत आहेत. या 14 IPO मध्ये दोन आयपीओ ए आहेत, की त्यांनी आतापर्यंत आपल्याला गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. Concorde Control System Limited कंपनीच्या शेअर्सने फक्त एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 138.65 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. तर Steelman Telecom या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130.05 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. हे दोन्ही कंपन्यां 10 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Money from IPO | आयपीओ अलर्ट! पुढच्या आठवड्यात 4 IPO बाजारात येणार आहेत, कमाईची संधी
Money from IPO | शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना बंपर कमाईची संधी मिळणार आहे. या आठवड्यात 4 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहेत. या 4 कंपनीच्या IPO च्या माध्यमातून 5000 कोटी रुपये उभारण्याचे प्रयत्न केले जातील. 2022 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी डगमगलेली राहिली आहे. अशा परिस्थितीत आयपीओ मध्ये गुंतवणुक करून लोकांना कमाईची संधी मिळणार आहे. भारतीय शेअर बाजाराचे मूलभूत तत्त्वेही मजबूत असून तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून कमाई करू शकता चार जबरदस्त IPO बाजारात येणार आहेत, त्यासाठी बँकेत पैसे तयार ठेवा.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओ गुंतवणूक हलक्यात घेऊ नका, वर्षभरात 25 ते 95 टक्के परतावा देत आहेत, ही स्टॉकची यादी सेव्ह करा
IPO investment| 2022 या वर्षात 23 पैकी 4 असे IPO बाजारात सूचीबद्ध झाले आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 100.टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. यामध्ये व्हरांडा लर्न, व्हीनस पाईप्स, अदानी विल्मर आणि रुची सोया इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Keystone Realtors IPO | 14 नोव्हेंबरला कीस्टोन रियल्टर्स आयपीओ लाँच होणार, गुंतवणुकीची सुवर्ण संधी
Keystone Realtors IPO | रुस्तमजी ब्रँडअंतर्गत मालमत्तांची विक्री करणाऱ्या कीस्टोन रियल्टर्स या मुंबईतील कंपनीचा आयपीओ १४ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 16 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) च्या मते, कंपनी 635 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. या आयपीओचा आकार कमी करण्यात आला आहे. याआधी कंपनीने 850 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती.
2 वर्षांपूर्वी -
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स IPO चं शेअर्स अलॉटमेंट झालं, शेअर्स 75 रुपये प्रीमियमवर, अधिक माहिती समोर आली
DCX System IPO | या कंपनीच्या IPO मध्ये जरी करण्यात आलेले शेअर्स 7 नोव्हेंबर 2022 रोजी वाटप करण्यात आले. DCX कंपनीचा IPO 31 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ग्रे मार्केटमध्ये DCX Systems कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांच्या मते, DCX कंपनीचे शेअर्स 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. तुम्ही DCX सिस्टम कंपनीचे शेअर वाटप ऑनलाईन तपासू शकता. चलंत्र मग जाणून घेऊ तुम्ही शेअर्स अलॉटमेट कशी तपासू शकता याची पूर्ण प्रक्रिया
2 वर्षांपूर्वी -
Bikaji Foods IPO | बिकाजी फुडस IPO सबस्क्रिप्शन पूर्ण, शेअरचा GMP जाणून घ्या, कमाईचा धमाका होणार
Bikaji Foods IPO | बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफर/IPO गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. IPO ओपन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर्स पूर्णपणे सबस्क्राइब झाले आहेत. शिवाय, सलग दोन दिवसांच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क आठवड्याच्या वधारले. या घडामोडीचा परिणाम ग्रे मार्केटमध्येही दिसून आला होता. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, ग्रे मार्केटमध्ये बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बिकाजी फूड्स कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये प्रति इक्विटी शेअर 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
IPO Money Magic | आयपीओ असावा तर असा, एकदिवसात 200% परतावा, मजबूत पैसा देणाऱ्या शेअरबद्दल वाचा
IPO Money Magic | फॅंटम डिजिटल इफेक्ट्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 300 रुपये प्रति शेअर्स या किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ज्या दिवशी कंपनीचा IPO लिस्ट झाला होता, त्यादिवशी शेअर्स 315 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि स्टॉकवर विक्रीचा दबाव वाढू लागला. परिणामी कंपनीच्या शेअरची किंमत पडली आणि पहिल्याच दिवशी स्टॉक 312.70 रुपये प्रति शेअर या किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचा IPO ज्या दिवशी लिस्ट झाला त्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्क्यांहून अधिक वाढले होते. कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 91 रुपये ते 95 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
INOX Green Energy IPO | गौतम अदाणींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान
INOX Green Energy IPO | सध्या शेअर बाजारात IPO चा सिजन सुरू झाला आहे. एकावर एक असे जबरदस्त कंपनीचे IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आले आहेत. जर तुम्ही सध्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग/IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक मजबूत संधी मिळणार आहे. शुक्रवारी 11 नोव्हेंबर 2022 रोजी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस/IGESLचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO मध्ये एका शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान असेल असे निश्चित करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO