महत्वाच्या बातम्या
-
JEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश
जेईई-मेन, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. ज्यामध्ये एकूण 44 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांमध्ये राजस्थानमधील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा रहिवासी सिद्धांत मुखर्जी यांचे नाव आहे. तो कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून तयारी करत होता. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या तिसऱ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 20 जुलै, 22 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै या तारखांना परीक्षा होणार आहे. चौथ्या सेशनच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असं NTA ने सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Exam 2021 | JEE मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, असा करा अर्ज
जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नॅशनल टेस्टींग एजन्सीची वेबसाईट jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर अर्ज करु शकतात. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु इच्छितात ते 12 जुलैपूर्वी अर्ज दाखल करु शकतात. जेईई मेन परीक्षा 2021 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Exam Updates | मुख्य परीक्षेसाठी १२'वीत 75 टक्के गुणांची अट रद्द
जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान ७५ टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी ७५ टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आयआयटी जेईईसाठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.
4 वर्षांपूर्वी -
JEE Advanced 2020 Results | एकूण 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
JEE Advance 2020 चा निकाल नुकतंच जाहीर करण्यात आला आहे. जवळपास 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील पेपर 1 आणि 2 मध्ये जवळपास 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 हजार 707 विद्यार्थिनी आहेत.
4 वर्षांपूर्वी -
JEE Advanced 2020 | परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या
JEE Advanced 2020: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली JEE Advanced परीक्षा रविवारी २७ सप्टेंबर रोजी देशभरात होत आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांना कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
JEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर
जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS