JEE Advanced 2020 | परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी या सूचना लक्षात घ्या
मुंबई, 26 सप्टेंबर : JEE Advanced 2020: देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली JEE Advanced परीक्षा रविवारी २७ सप्टेंबर रोजी देशभरात होत आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत, त्यांना कोविड-१९ प्रादुर्भावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
JEE Advanced Exam देण्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९८ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे, असा आयआयटी दिल्लीचा दावा आहे. मास्क वापरणे, स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत पारदर्शक बाटलीत बाळगणे आणि त्याचा वापर करणे गरजेचे आहे. या गोष्टींशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी आयआयटी अलुम्नायने एक पोर्टलही लाँच केले आहे. Eduride असे या पोर्टलचे नाव आहे, अशी माहितीही आयआयटी दिल्लीने दिली आहे.
आरोग्यविषयक खबरदारी म्हणून कोणकोणत्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करायचे आहे त्या पुढीलप्रमाणे :-
- विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे फेसमास्क वापरावेत आणि पारदर्शक बाटलीत सॅनिटायझर बाळगावे. पाण्याची बाटलीही पारदर्शक हवी.
- दोन जणांमध्ये कायम किमान सहा फुटांचे अंतर हवे. यासाठी परीक्षा केंद्रांवर रांग लावण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात येईल. तेथील कर्मचारी सांगतील त्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे.
- परीक्षा केंद्रात शिरताना विद्यार्थ्यांच्या Admin Card वरील बार कोड स्कॅन होईल. त्यानंतर त्यांनी परीक्षा हॉलचा क्रमांक दिला जाईल.
- विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी हात सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
- परीक्षेसाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ सेल्फ डिक्लेरेशन असणे गरजेचे आहे, अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
देशभरातील एकूण २२२ शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. एकूण एक हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. अधिकृत माहितीनुसार एकूण १ लाख ६० हजार ८३१ विद्यार्थ्यांनी यंदा JEE Advanced परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
News English Summary: JEE Advanced 2020: Indian Institute of Technology, Delhi has released the necessary standard operating procedure (SOP) for the upcoming Joint Entrance Examination (JEE) Advanced 2020. The exam is going to be held on 27 September. IIT Delhi is responsible for conducting the countrywide entrance exam. The institute has confirmed that no candidate will be denied entry to the examination centres if they follow all the specified COVID-19 guidelines.
News English Title: JEE Exam advanced 2020 instruction students must follow before entering exam centre Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन