5 November 2024 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

JEE Exam Updates | मुख्य परीक्षेसाठी १२'वीत 75 टक्के गुणांची अट रद्द

JEE Main 2021, IIT JEE education minister, waives off 75 criteria

मुंबई, १९ जानेवारी: जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान ७५ टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी ७५ टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आयआयटी जेईईसाठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील महिन्यात याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता JEE मेन्स परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. 12वी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

 

News English Summary: Students are exempted from the requirement of at least 75% marks for JEE Main Examination. Union Minister Ramesh Pokhriyal has said that the condition of getting at least 75% marks in Class XII will not be applicable this year. In line with the decision taken for IIT JEE and the decision taken for the previous academic year, the Ministry of Education has relaxed the eligibility criteria for obtaining at least 75% marks in Class XII for the Joint Academic Examination (Main) for the next academic year 2021-22. Admissions related to NIT, IIIT, SPA and other CFTIs are based on JEE (Main).

News English Title: JEE Main 2021 after IIT JEE education minister waives off 75 criteria for admissions as well news updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x