22 February 2025 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

JEE Main Result 2021 | जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश

JEE Main Result 2021 link

मुंबई, १५ सप्टेंबर | जेईई-मेन, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. ज्यामध्ये एकूण 44 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांमध्ये राजस्थानमधील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा रहिवासी सिद्धांत मुखर्जी यांचे नाव आहे. तो कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून तयारी करत होता. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.

जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश – JEE Main Result 2021 link will be activated on the official website JEEMain.NTA.NIC.IN

या वर्षापासून, संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) -वर्षातून चार वेळा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यातील पहिला टप्पा फेब्रुवारी आणि दुसरा मार्चमध्ये पार पडला आहे. तर पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये होणार होत्या, परंतु देशातील कोविड -19 साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर तिसरा टप्पा 20-25 जुलै दरम्यान तर चौथा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आला.

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2021 च्या चौथ्या टप्प्याच्या निकालाची लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट पाहत होते. मंगळवारी तो निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या 18 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्यो कोटा येथील कोचिगं क्लालेसमधून शिकवणी घेणाऱ्या सिद्धांत मुखर्जी आणि अंशुल वर्मा या दोघांचाही समावेश आहे. या दोघांनीही जेईई मेनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात अव्वल स्थान मिळवले आहे.

कोटोमधून जेईईची तयारी करून टॉप रँकच्या यादीत नाव पटकवणारा सिद्धार्थ मुखर्जी हा मुंबईचा रहिवासी आहे. सिद्धांतने कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून शिकवणी लावली होती. सिद्धार्थने फेब्रुवारी 2021 च्या जेईई मुख्य सत्रात 300 पैकी 300 गुण पटकावले होते. तर कोटा येथील कोचिंग क्लासेसचा दुसरा विद्यार्थी अंशुल वर्मा याने देखील या परीक्षेत 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: JEE Main Result 2021 link will be activated on the official website JEEMain NTA NIC IN

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#JEEMainExam2021(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x