16 April 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

शिंदेंच्या बंगल्यापासूनच खड्ड्यांच्या साम्राज्याची सुरुवात | खड्डेमय कल्याणची मनसेकडून पोलखोल

Kalyan Gramin MNS MLA Raju Patil, ShivSena MP Shrikant Shinde, Minister Eknath Shinde

कल्याण-डोंबिवली, २६ ऑगस्ट : मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

आमदार राजू पाटील ट्विट करून म्हणाले होते की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.

त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे नेत्याने प्रत्युत्तर दिले होते. “ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल”, असा टोला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना लगावला होता.

“रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण शीळ रस्त्यावर वाहतुकीचा ताण आहे. वेळ मिळतोय तसा पॅचवर्क, डांबरीकरण, काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. या रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरणाचं काम काम सुरु आहे. कोरोना संकट असूनसुद्धा या रस्त्याचं काम बंद पडले नाही. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे खड्डे होत आहेत. मात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरु असून लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल”, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे .

दरम्यान, या टीकेनंतर राजू पाटील यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासमोरच जाऊन रस्यावर असलेला खड्डा दाखवला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यापासूनच कल्याणच्या खड्ड्यांची कशी चाळण झाली आहे याचा व्हिडिओच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन बनवला आणि शिंदे शाहीची पोलखोल केल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मनसे पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: MNS MLA Raju Patil made a video of how the pits of Kalyan have been drained from the bungalow of MP Shrikant Shinde. So now Shiv Sena and MNS are likely to quarrel again.

News English Title: Kalyan Gramin MNS MLA Raju Patil has gone in front of Shiv Sena MP Shrikant Shindes bungalow and shown the pit on the road News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या