5 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

कल्याण-डोंबिवली | शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मोर्चा

MNS Kalyan Morcha, Manoj Gharat

कल्याण, १२ फेब्रुवारी: ज्या विषयांना पुढे करून मोदी सरकार सत्तेत आलं त्याच विषयांवर ते आज डोळेझाक करताना दिसत आहेत. त्यातील महत्वाचा विषय म्हणजे पेट्रोल-डिझेल ज्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. याच विषयाला अनुसरून कल्याणमध्ये मनोज घरत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थिती नोंदवली होती. यावेळी मनसेने सज्जड दम देताना म्हटलं की, इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश भोईर, कौस्तूभ देसाई, इरफान शेख, अशोक मांडले, उल्हास भोईर, उर्मिला तांबे, दीपीका पेडणेकर, प्रकाश माने, मंदा पाटील आदी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डिङोलच्या दरवाढीने ९० रुपयांचा आकडा गाठला आहे. घरगूती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधनाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. २०१४ साली केंद्र सरकारला पेट्रोल डिझेलच्या करापोटी ५३ हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. तरी देखील दरवाढ कमी न करता ती सामान्यांच्या माथी मारली जात आहे.

 

News English Summary: Today, they seem to be turning a blind eye to the same issues on which the Modi government came to power. The key issue is petrol-diesel which has bothered the common man. Following this issue, a Morcha was taken out in Kalyan under the leadership of Manoj Gharat. A large number of Maharashtra soldiers were present at this time. At this time, MNS, while giving a strong breath, said that it is now joining hands to reduce the fuel price hike. Maharashtra Navnirman Sena has given a warning not to raise your hand.

News English Title: MNS Kalyan Morcha was taken out under the leadership of Manoj Gharat news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x