13 January 2025 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा

Bank Account Alert

Bank Account Alert | फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD योजना भारतातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सुरक्षित आणि लाभदायक योजना आहे. बरेच गुंतवणूकदार बँकेच्या एफडीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे म्हणतात. तसं पाहायला गेलं तर, भारतात सर्वाधिक महिलांचे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे FD गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे.

नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. बऱ्याच व्यक्तींनी आपल्या गुंतवणुकीबाबत पुढील वर्षापर्यंत मोठा कॉर्पस जमा करण्याचा निर्धार हाती घेतला असेल. तुम्ही एफिडच्या माध्यमातून देखील मोठा निधी तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला 365 दिवसांत कोणकोणत्या एफडी योजना सर्वाधिक परतावा देतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.

जना स्मॉल फायनान्स बँक :

एका वर्षात म्हणजेच 365 दिवसांमध्ये सर्वाधिक परतावा मिळवून देणारी स्मॉल फायनान्स बँकेतील एफडी तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. जना स्मॉल बँकेत ग्राहकांना एफडी गुंतवणुकीवर 8.24% टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. तुम्ही नवीन वर्षात या एफडी बनवून सर्वाधिक परतावा मिळवू शकता.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक :

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ही एक स्मॉल म्हणजे छोटी फायनान्स बँक आहे. जी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त परतावा देण्याचा प्रयत्न करते. या बँकेतील एफडीवर गुंतवणूकदारांना 365 दिवसांच्या वार्षिक आधारावर 8.05% टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात या बँकेत एफडी करून पैसे गुंतवूण करू शकता.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक :

जना स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना 365 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला वार्षिक आधारावर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतील एफडी 8.25% दराने व्याजदर प्रदान करते. स्मॉल फायनान्स बँकेतील सर्वाधिक परतावा देणाऱ्या बँकांपैकी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देखील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक :

माध्यमांकडून मिळालेला माहितीनुसार इक्विटास स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता सर्वाधिक परतावा देण्याचा प्रयत्न करते. या बँकेत तुम्ही 365 दिवसांसाठी म्हणजेच एका वर्षाच्या कार्यकाळासाठी एफडीमध्ये पैसे गुंतवले तर, तुम्हाला 8.10% दराने रिटर्न दिले जातील.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक :

वर सांगितलेल्या बँकांप्रमाणे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना सर्वाधिक परतावा देण्याचा प्रयत्न करते. सध्या सामान्य उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 8% दराने व्याजदर प्रदान करत आहे. 365 दिवसांच्या म्हणजेच एका वर्षाच्या एफडी गुंतवणुकीतून यांपैकी 5 बँक एफडीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर, लवकरात लवकर श्रीमंत बनू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Account Alert Monday 13 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x