26 December 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA
x

Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स

Bank Locker

Bank Locker | बऱ्याच बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंकरिता बँक लॉकर प्रदान करतात. जेणेकरून तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू अतिशय सुरक्षित रहावी. पण तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना नेमक्या कोणत्या मौल्यवान वस्तू बँक लोकरमध्ये ठेवण्याची परवानगी आहे याबद्दल माहिती नाही. आज आपण या बातमीपत्रातून बँक लॉकरमध्ये ठेवण्याच्या सर्व वस्तूंची यादी पाहणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक यांसारख्या अधिक बँका ग्राहकांना वेगवेगळे लॉकर प्रदान करतात. म्हणजेच प्रत्येक बँकेनुसार त्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्याच्या वस्तूंची यादी देखील वेगवेगळी असते. आज आपण HDFC, ICICI आणि SBI या तीन बँकांच्या लॉकरविषयी जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण बँक लॉकरच्या काही नियमानबद्दल जाणून घेऊया :

1. बँक लॉकरमध्ये असणाऱ्या तुमच्या वस्तूंना सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल.
2. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची यादी बनवून घ्या.
3. लॉकरविषयीची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर गरजेनुसार लॉकर निवडा.
4. बँक लॉकर वापरताना बँकांच्या सर्व नियमांचे पालन करा.
5. बँक लॉकरच्या वापरामुळे तुम्हाला तुमच्या बऱ्याच मौल्यवान वस्तूंना सुरक्षित ठेवता येणार आहे.

या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्याची आहे परवानगी

दागिने :
बँक लॉकरमध्ये तुम्हाला सोनं, चांदी त्याचबरोबर इतर मौल्यवान वस्तू ठेवता येणार आहेत. त्याचबरोबर सोन्याच्या विटा आणि चांदीच्या विटा देखील ठेवू शकता.

आर्थिक कागदपत्रे :
तुम्ही आर्थिक कागदपत्रांमध्ये विमा किंवा पॉलिसी संबंधितच्या सर्व डिटेल्सची कागदपत्रे, म्युच्युअल फंड शेअर सर्टिफिकेट यांसारख्या अनेक आर्थिक कागदपत्रे ठेवू शकता.

पर्सनल कागदपत्रे :
स्वतःचे मृत्युपत्र, एखादी वस्तू किंवा व्यक्ती दत्तक घेण्यासंबंधीचे कागदपत्रे, पॉवर ऑफ ॲटर्नी, मालमत्ते संबंधित कागदपत्रे यांसारखी कागदपत्रे देखील लॉकरमध्ये ठेवू शकता.

बँकेमध्ये या गोष्टी ठेवता येत नाही :
1. बेकायदेशीर वस्तू, शस्त्रे, औषधे, स्फोटके
2. गंज लागणारी घातक सामग्री.
3. रोख रक्कम.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bank Locker 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Locker(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x