14 December 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा

Best Saving Scheme

Best Saving Scheme | मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या शिक्षणाची चिंता प्रत्येक पालकाला सतावते. आपलं मूल देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे चांगल्या कॉलेजमध्ये आणि तिथून पुढे स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम व्हावे यासाठी बरेच पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीकडे भरघोस पैसे नसतात.

लहान मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सरकारकडून विविध सरकारी योजना राबवल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला एकूण 4 योजनांविषयी पुरेपूर माहिती सांगणार आहोत. या योजना केवळ चांगलं व्याजदरच नाही तर 100% परताव्याची हमी देखील देतात. चला तर मग मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी जाणून घ्या योजनांविषयी संपूर्ण माहिती.

NPS वात्सल्य योजना :

एनपीएस वात्सल्य योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविली जाणारी योजना आहे. ही योजना एक प्रकारची पेन्शन योजना असून PFRDA म्हणजेच ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’ अंतर्गत योजनेचा सर्व कामकाज सुरू असते. योजनेमध्ये तुम्ही केवळ 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. दरम्यान योजनेमध्ये जमा असलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. चक्रवाढ व्याजामुळे तुम्हाला भविष्यात मोठा फंड तयार करण्यात मदत होते. तुम्हाला देखील तुमच्या लहान मुलांचं NPS वात्सल्य योजनेत खातं उघडायचं असेल तर, इंडिया पोस्ट, पेन्शन फंड, त्याचबरोबर इतर बँकांमध्ये जाऊन तुम्ही अगदी सहजपणे खातं उघडू शकता.

म्युच्युअल फंड SIP :

जे पालक आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड SIP हे माध्यम अत्यंत फायद्याचे ठरेल. समजा एसआयपीमध्ये तुम्हाला 12 ते 16 किंवा 15% परतावा मिळत असेल तर, योग्य कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या मुलांच्या नावे 10,000 रुपयांची एसआयपी करू शकता. समजा तुम्हीही एसआयपी 20 वर्ष सातत्याने सुरू ठेवली तर, कंपाऊंडिंग व्याजाचा फायदा मिळवून 99,91,479 रुपयांचा लाभ मिळवू शकता. म्हणजे तुमच्या मुलांच्या भविष्याचे चिंताच मिटली.

PPF अकाउंट :

मुलांच्या नावे गुंतवणुकीसाठी तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ खात्यात देखील पैसे गुंतवू शकता. पीपीएफ तुम्हाला सुरक्षित परतावा देते. त्यामुळे आई-वडील दोघेही मिळून आपल्या मुलाच्या नावे गुंतवणूक करू शकतात. पीपीएफ खाते 15 वर्षांनंतर मॅच्युअर होते. तुम्हाला आणखीन गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही हे खातं पुढे एक्सटेंड करून घेऊ शकता. क्या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 1.50 लाखांची गुंतवणूक करू शकता तर, कमीत कमी गुंतवणुकीची लिमिट केवळ 500 रुपये दिली आहे.

सुकन्या समृद्धी योजना :

‘सुकन्या समृद्धी योजना’ ही योजना खास करून देशातल्या नारी शक्तीकरिता बनवण्यात आली आहे. प्रत्येक प्रवर्गातील मुलीला शिक्षणाचा पुरेपूर अधिकार आहे. परंतु आर्थिक तंगीमुळे प्रत्येकाला हे शक्य होत नाही. म्हणूनच केंद्र सरकार सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. योजनेत गुंतवणुकीसाठी तुम्ही 250 रुपये भरून देखील सुरुवात करू शकता. ही योजना तुम्हाला वार्षिक दरावर 8.2% व्याज प्रदान करते. समजा एखाद्या पालकाने या योजनेमध्ये दीड लाखांची रक्कम गुंतवली तर, त्याच्या मुलीचं 21 वर्ष होईपर्यंत ही रक्कम 69 लाखांपर्यंत जमा होईल. ही योजना 2015 साधी सुरू झाली होती. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेत मुलीच्या नावाने खातं उघडून रक्कम जमा करण्यासाठी मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक नसले पाहिजे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Best Saving Scheme Saturday 14 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Best Saving Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x