15 January 2025 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
x

Cancelled Cheque | अशा प्रकारच्या चेक मागे 'सही' केली नाही तर होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या नियम - Marathi News

Highlights:

  • Cancelled Cheque
  • नियम माहित करून घेणे गरजेचे आहे :
  • या चेक मागे स्वाक्षरी करणे गरजेचे आहे :
  • चेक हरवल्यास बँक जबाबदार नसेल :
Cancelled Cheque

Cancelled Cheque | आजकाल कोणताच व्यक्ती रोजच्या वापरातील व्यवहार कॅश पेमेंट किंवा चेक पेमेंटने करत नाही. सर्वजण डिजिटल वाटचालीकडे वळत आहेत. बहुतांश व्यक्ती यूपीआयमार्फत पेमेंट करतात. परंतु काही गोष्टी अशा आहेत जिथे चेक पेमेंट करावे लागते. तुम्ही आतापर्यंत बँकांच्या काही कामांसाठी किंवा हॉस्पिटलमधील पेमेंटसाठी चेक पेमेंट नक्कीच केलं असेल. चेक पेमेंट करताना तुम्ही एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर तुमचा चेक बाउन्सही होऊ शकतो.

नियम माहित करून घेणे गरजेचे आहे :

तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर, तुम्हाला चेकबद्दलचे काही नियम माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही न केलेली एक सही तुमचं फार मोठे नुकसान करू शकते. परंतु हे नियम नेमके कोणकोणत्या चेकसाठी लागू होतात हे अनेकांना माहीत नसतं. चला तर पाहूया.

या चेक मागे स्वाक्षरी करणे गरजेचे आहे :

काही साधेच चेक असतात. ज्या मागे सही केली नाही तरीसुद्धा कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. परंतु तुमचा चेक ‘बेअरर’ चेक असेल तर, अशा चेक मागे सही करणे अत्यंत गरजेचे असते. समजा तुमच्याकडे ‘ऑर्डर’ चेक असेल आणि याचे एक मागे तुम्ही स्वाक्षरी केली नसेल तर, त्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. परंतु बेअरर चेक एक असाच एक आहे की, तो तुम्हाला बँकेमध्ये जमा करावा लागतो. अशा पद्धतीच्या चेकमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. त्यामुळे चेक मागे सही केल्याने तुमचा चेक सुरक्षित राहते.

चेक हरवल्यास बँक जबाबदार नसेल :

बेअरर चेकमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते त्यामुळे बँकांकडूनच बेअरर चेक मागे सही करण्यास सांगितले जाते. समजा सही न केलेला चेक एखाद्या व्यक्तीच्या हाती लागला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमचा चेक चोरीला गेला तर, याची जबाबदारी बँक कधीच घेत नाही. यामध्ये सर्वस्वी तुमचीच चूक दाखवण्यात येते. त्यामुळे चेकचे काही नियम समजून घेण्यात अत्यंत गरजेचे असते.

Latest Marathi News | Cancelled Cheque Rules 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Cancelled Cheque(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x