
CIBIL Score | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी लोन घेतोच. काहीजण पर्सनल लोन घेतात तर, काही गाडी घेण्यासाठी तर, काहीजण घरासाठी होम लोन, बिझनेस लोन इत्यादी लोन घेत असतात. ज्या व्यक्तींनी आतापर्यंत अनेकवेळा लोन व्यवहार केले असतील त्यांना सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय असतं याची पूर्णपणे कल्पना असेलच.
परंतु काहींना सिबिल स्कोर म्हणजे काय? किती सिबिल स्कोरवर आपल्याला चांगलं लोन मिळतं? त्याचबरोबर आपला सिबिल स्कोर नेमका किती असावा? या सर्व प्रश्नांची उत्तर माहितच नसतात. आज आम्ही तुम्हाला तुमचा मिनिमम सिबिल स्कोर किती असला पाहिजे आणि त्याच्या फायद्यांबद्दल माहिती सांगणार आहोत.
CIBIL स्कोर काढणारी कंपनी नेमकं काय काम करते?
CIBIL स्कोरमध्ये ‘ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड’ या कंपनीकडे लोन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा फायनान्शिअल डाटा असतो. या माहितीमध्ये व्यक्तीने आतापर्यंत किती वेळा कर्ज घेतलं आहे. सोबतच व्यक्तीने एखाद्या व्यवसायासाठी किंवा स्वतःसाठी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडत आहे की नाही? या सर्व गोष्टी कंपनीत थ्रू तपासल्या जातात. व्यक्तीच्या या संपूर्ण माहितीवरुन ज्याचा त्याचा CIBIL स्कोर काढला जातो.
CIBIL स्कोर वाढण्यासाठी बँकेचा व्यवहार चांगला असावा :
तुमचा बँकिंग व्यवहार स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, लग्न खर्चासाठी कोणत्याही कामासाठी अगदी सहजरीत्या चांगलं लोन मिळू शकत. व्यवहार चांगला असल्यावर CIBIL स्कोर वाढू लागतो. या वाढलेल्या स्कोरवर तुम्हाला चांगले लोन मिळू शकते.
मिनिमम CIBIL स्कोर किती असावा?
तुमचा CIBIL स्कोर तुमच्या संपूर्ण डेटा, रिपोर्ट आणि क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असतो. तुमचा CIBIL स्कोर 300 ते 900 च्यादरम्यान असलाच पाहिजे. तुमचा स्कोर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला चांगलं लोन मिळू शकतं. 750 या अंकाजवळ CIBIL स्कोर असणाऱ्या व्यक्तींना जास्तीत जास्त लोन मिळतं. तर, कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांना कर्जासाठी जास्त झिकझिक करावी लागते. त्याचबरोबर 750 हुन कमी सिबिल स्कोर असणाऱ्यांना वित्तीय संस्था किंवा बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देऊ इच्छित नाहीत.
नियमत्ता गरजेची :
तुमचा क्रेडिट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोर 600 पेक्षा कमी असेल तर, तुम्ही पैसे परतफेडीच्या व्यवहारात तुमची नियमितता नाही आहे असं समजण्यात येईल आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड देखील मिळणार नाहीत.
क्रेडिट कार्ड म्हणजे असुरक्षित कर्ज :
क्रेडिट कार्ड हे एक असुरक्षित कर्ज असते. यासाठी अर्जदाराला कोणतीही सुरक्षा ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे ग्राहकांना क्रेडिट कार्ड देताना बँकांना जास्तीची जोखीम उचलावी लागते.




























