21 February 2025 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

CIBIL Score | 'या' 5 चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोर कधीच सुधारणार नाही, पुढील टिप्स फॉलो करा अन्यथा कर्ज घेणे विसरा

CIBIL Score

CIBIL Score | सध्याच्या या महागाईच्या काळात विवाह करताना देखील सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो आणि त्यानंतर तुमचे स्टेटस पाहिले जाते. सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँका आणि वित्तीय संस्था तुम्हाला भविष्यात कर्ज देण्यास मंजुरी देतील परंतु उतरता सिबिल स्कोर पाहता कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक तुम्हाला जवळही उभं करणार नाही.

कर्ज घेताना काही व्यक्ती अशा चुका करून बसतात की, त्यांना भविष्यात कर्ज मिळणे कठीण होऊन बसते. अनेकदा काही चुकांमुळे तरुण आपला सिबिल स्कोर खराब करून बसतात आणि कर्ज मिळणार नाही म्हणून निराश होतात. आज आम्ही तुम्हाला काही कारणे सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोर घसरणीस लागतो. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती मुख्य कारणे.

1. कर्जाचा हप्ता आणि इतरही दिले वेळेवर न भरणे :
सिबिल स्कोर कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तुमचे वेळेवर कर्ज न भरणे. बऱ्याच व्यक्तींना अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कर्ज भरण्याची सवय असते. काहीवेळा तारीख लक्षात राहत नाही आणि कर्जाचे हप्ते भरणे राहून जाते. अशा परिस्थितीत काही व्यक्तींकडून क्रेडिट कार्डचे बिल देखील वेळेवर पेमेंट केले जात नाही. या सर्व गोष्टींमुळे तुमचा सिबिल स्कोर घसरतो आणि तुम्हाला कर्ज मिळण्याचे चान्सेस कमी होतात.

2. क्रेडिट कार्डचा अयोग्य वापर करणे :
सध्याच्या घडीला क्रेडिट कार्ड वापरणे ट्रेडिंग झाले आहे. प्रत्येक व्यक्ती जवळ क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डमुळे पेमेंट पद्धत अतिशय सोपी होऊन बसली आहे. परंतु असे बरेच व्यक्ती आहेत ज्यांना क्रेडिट कार्ड विषयीची माहिती नाही. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर, क्रेडिट कार्डच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, क्रेडिट कार्ड वापरण्याची लिमिट ही केवळ खरेदी केलेल्या कार्डपेक्षा 30% असावी. अन्यथा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.

3. कर्जासाठी वारंवार अर्ज करणे :
जो व्यक्ती कर्जासाठी वारंवार अर्ज करतो तो बँकेच्या नजरेत येतो. तुम्ही एक कर्ज पडल्यानंतर लगेचच दुसरं त्यानंतर तिसरा आणि अशा पद्धतीने वारंवार खर्च घेत असाल तर, बँक सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासते. वारंवार कर्ज घेतल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होत जातो. त्यामुळे तुम्हाला बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून वारंवार कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते आणि या गोष्टीमुळे तुमचा सिबिल स्कोर कधीच सुधारत नाही.

4. क्रेडिट कार्ड बंद करणे :
काही व्यक्ती त्यांचे वापरून झालेले क्रेडिट कार्ड बंद करून टाकतात. परंतु क्रेडिट कार्ड बंद केले नाही तर तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. या उलट क्रेडिट कार्ड बंद केल्यामुळे तुमचा क्रेडिट युटीलायझेशन स्कोर वाढतो. या कारणामुळे तुमचा सिबिल स्कोर देखील खराब होत जातो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x