29 January 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील

CIBIL Score

CIBIL Score | सर्वप्रथम आपण सिबिल स्कोर म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेऊ. सिबिल स्कोर हा एक तीन अंकी क्रमांक असतो. जो 300 ते 900 या आकड्यांदरम्यान पाहायला मिळतो. समजा तुमचा सिबिल स्कोर 300 ते 500 च्यादरम्यान असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यास अडचणीला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान तुम्ही 500 ते 900 च्या दरम्यान सिबिल स्कोर मेंटेन ठेवला तर, बँक तुम्हाला त्वरित कर्ज उपलब्ध करून देते.

दरम्यान प्रत्येक व्यक्ती त्याच्या गर्जा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतो. परंतु क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर त्या व्यक्तीला बँकेकडून लोन नाकारण्यात येते. काही कारणांमुळे लोन देणे शक्य जरी झाले तरीसुद्धा जास्तीत जास्त व्याजदर भरावे लागू शकते. अशा परिस्थितीत कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे जास्त नुकसान होते. त्यामुळे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब होऊन न दिला पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 4 प्रकारच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सुधरवण्यास मदत होईल.

लोन मिळण्यास अडचणी निर्माण होतील :

सांगितल्याप्रमाणे तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात डाऊन असेल तर तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस फार कमी असतात. इतर स्मॉल फायनान्स बँक त्याचबरोबर एनबीएफसीकडून देखील कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर खराब आहे असं कळल्याबरोबर तुमचा ईएमआय बाउन्स किंवा डिफॉल्ट करून घ्या.

कोणत्याही प्रकारचे लोन मिळणार नाही :

तुमचा सिबिल स्कोर ढासळत चालला असेल सर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन मिळणार नाही. दरम्यान सिबिल स्कोर खराब असताना तुम्हाला वैयक्तिक कर्ज त्याचबरोबर बिजनेस लोन घ्यायचे असेल तर, तुम्हाला कर्जासाठी एखादी संपत्ती गहाण ठेवण्यासाठी बँकेकडून सांगावा येईल. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर बिघडून देऊ नका.

जास्तीचे प्रीमियम भरावे लागू शकते :

प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारचे इन्शुरन्स काढतो. अशा परिस्थितीत व्यक्तीचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झाला असेल तर, इन्शुरन्स कंपनी जास्तीचे प्रीमियम आकारते. तुमचा सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांना तुम्ही जास्त प्रमाणात क्लेम कराल असं वाटतं. त्यामुळे कंपन्या तुमच्याकडून जास्तीचे प्रीमियम आकारण्याचा प्रयत्न करते.

जास्तीचा इंटरेस्ट भरावा लागू शकतो :

सिबिल स्कोर खराब असल्यानंतर तुम्ही कर्ज घेतलं तर, बँक तुमच्याकडून अधिकचे इंटरेस्ट वसूलते. काही बँका सिबिल स्कोर खराब असून देखील कर्ज देण्यासाठी तयार होतात. परंतु अशा परिस्थितीत बँका अधिकचे व्याजदर वसूलण्याचा प्रयत्न करतात. बँकांना असं वाटतं की, कर्जदाराने कर्ज फेडताना काही वेळा हफ्ता बुडवला तर, मिळालेल्या जास्तीच्या इंटरेस्टमधून बँक ऍडजस्टमेंट करून घेते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Monday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x