13 January 2025 8:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल

CIBIL Score

CIBIL Score | सध्या बरेच व्यक्ती मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. परंतु बहुतांश व्यक्ती असेही आहेत जे फार कमी प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही अगदी सहजपणे पेमेंट करू शकता. जलद सुविधा पुरवणारे हे क्रेडिट कार्ड तुम्हाला जबरदस्त ऑफर्स देखील देते.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट देखील मिळतात. क्रेडिट कार्ड घेणे म्हणजे एक प्रकारचे कर्ज घेण्यासारखे आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना सावधगिरी बाळगा. तुम्हाला क्रेडिट कार्डचे पेमेंट पूर्ण करताना व्याजासकट करावे लागते. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्ती क्रेडिट कार्डच्या फायद्यांविषयी पूर्णपणे माहिती असेल परंतु क्रेडिट कार्डच्या नुकसानांबद्दल देखील माहित असणे तितकेच गरजेचे. आज आम्ही कोणत्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा वापर करू नये हे सांगणार आहोत.

खर्चावर नियंत्रण नसणे :

काही लोक अतिशय खर्चिक असतात. त्यांना वारंवार पैशांची उधळपट्टी करायला आवडते. एखादी नवीन वस्तू दिसली तर, लगेच ती खरेदी करण्याचा मोह त्यांना आवरेनासा होतो. म्हणजेच काय तर खर्चावर नियंत्रण नसलेल्या व्यक्तींनी क्रेडिट कार्ड खरेदी करू नये.

वेळेवर क्रेडिट कार्डचे पेमेंट न करणे :

बऱ्याच व्यक्तींना क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्याचे परिणाम ठाऊकच नसतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेवर न भरल्यामुळे तुमच्याकडून व्याजाचे पैसे देखील उकळले जातात. एवढेच नाही तर, ग्राहकांची वित्तीय स्थिती देखील पूर्णपणे बदलते. महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब होऊ लागतो आणि तुम्हाला वेळेकाळी कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होतात.

लोनचे EMI भरत असणाऱ्या व्यक्तींनी क्रेडिट कार्ड वापरू नये :

लोनचे ईएमआय भरत असणाऱ्या व्यक्तींनी क्रेडिट कार्डचा वापर चुकूनही करू नये. कारण की तुमच्यावर आधीच एका गोष्टीचे कर्ज असते त्यामुळे डोक्यावर आणखीन कर्जाचा डोंगर करून घेऊ नका.

कमी वेतन असणाऱ्या व्यक्तीने क्रेडिट कार्ड खरेदी करू नये :

ज्या व्यक्तींना मासिक पगार केवळ गरजेपुरताच मिळत असेल त्यांनी चुकूनही क्रेडिट कार्ड खरेदी करू नये. समजा तुम्ही चुकून क्रेडिट कार्ड खरेदी केलच तर, वेळेवर बिल न भरल्यामुळे तुम्ही आणखीन कर्जामध्ये डूबत जाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Thursday 12 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x