26 April 2025 9:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल

CIBIL Score

CIBIL Score | प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही ही गोष्ट त्याच्या सिबिल स्कोरवर आधारित असते. व्यक्ती व्यवस्थितपणे आपली बिले वेळेवर भरतो आहे की नाही हे देखील त्याचा सिबिल स्कोर पाहून ठरते. तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन हवे असेल तर, सिबिल स्कोर चांगला ठेवावा लागेल. अशा परिस्थितीत आपण स्वस्त गर्ज कशा पद्धतीने मिळेल आणि खराब झालेला क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने सुधारला जाईल त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

क्रेडिट स्कोरचे महत्व :
1. कर्ज घेताना बँका कर्ज करणाऱ्या अर्जदाराचे सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासते.
2. व्यक्ती कर्ज फेडू शकणार की नाही ही गोष्ट देखील त्याची क्रेडिट हिस्ट्री पाहूनच पडताळली जाते.
3. व्यक्ती कशा पद्धतीने कर्ज फेडू शकेल, त्याच्याजवळ कर्ज फेडण्यासाठी चांगला इनकम सोर्स आहे की नाही या सर्व गोष्टी पडताळल्या जातात.
4. क्रेडिट स्कोर 700 पर्यंत असेल तर, व्यक्तीचा कर्ज परतफेडीचा परफॉर्मन्स चांगला आहे असं मानलं जातं.

क्रेडिट स्कोरच्या परिणामांविषयी जाणून घ्या :
तुमचा क्रेडिट स्कोर अतिशय चांगला असेल तर तो, 750 ते 900 या आकड्यादरम्यान असतो. 750 ते 670 दरम्यान देखील तुमचा क्रेडिट स्कोर चांगला मानला जातो. 699 ते 590 आकड्या दरम्यान तुमचा क्रेडिट स्कोर ठीक ठाक मानला जातो. त्याचबरोबर 500 ते 300 च्या दरम्यानचा क्रेडिट स्कोर प्रचंड प्रमाणात खराब मानला जातो.

क्रेडिट स्कोर बिघडण्याचे नेमके कारण काय :
तुम्ही कर्ज वेळेवर भरत नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोर खराबच राहतो. तो कधीही सुधारत नाही. तुमच्या क्रेडिट कार्डची जेवढी मर्यादा आहे तेवढ्यात मर्यादेपर्यंत क्रेडिट लिमिट घ्यावी. जास्त लिमिट घेतली तर याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर म्हणजेच सिबिल स्कोरवर पाहायला मिळतो. कर्जाची बुडवणूक करत असल्यास देखील खराब होतो.

सोप्या पद्धतीने स्वतःचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत करा :
1. तुम्हाला जेवढे कर्ज हवे आहे तेवढेच घ्या. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका.
2. क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा.
3. तुम्ही ज्या वस्तूंवर EMI भरत आहात त्याचे हफ्ते चुकवू नका.
4. तुमच्या चालू क्रेडिट कार्डवर चुकून सुद्धा कर्ज घेण्याचा विचार करू नका. क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे टाळा.
5. तुमच्याजवळ जुने क्रेडिट कार्ड असेल तर, ते बंद करण्याचा विचार करू नका. तुम्ही जर तुमचे जुने क्रेडिट कार्ड बंद केले तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल.
6. तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर वारंवार तपासून पहा. बहुतांश व्यक्ती प्रत्येक महिन्याला आपला क्रेडिट स्कोर तपासून पाहतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | CIBIL Score Wednesday 29 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CIBIL Score(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या