26 December 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News

Credit Card Bill

Credit Card Bill | बहुतांश व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करतात. सध्या क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड पसरतच चालला आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही कुठेही आणि केव्हाही ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता. पैसे काढू शकता किंवा पेमेंटही करू शकता. अशातच क्रेडिट कार्डच्या बिलाविषयी सांगायचे झाले तर, क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही वेळेवर भरलं नाही तर, तुम्हाला लेट झाल्यामुळे फी किंवा भरपाई द्यावी लागेल.

तुमच्या या हलगर्जीपणामुळे क्रेडिट कार्ड स्कोर ढासळू शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या लोनवर देखील होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या क्रेडिट बिलचे पेमेंट योग्यवेळी करा. म्हणजेच पेमेंटच्या शेवटच्या तारखेपासून व्याजाची रक्कम लागणे सुरू होत नाही. ती महत्त्वाची गोष्ट तुम्ही कधीही विसरली नाही पाहिजे.

महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या :
क्रेडिट कार्ड वापर करत असणाऱ्या व्यक्तींना स्टेटमेंटनंतर 45 ते 50 दिवसांचा इंटरेस्ट फ्री पिरियड मिळतो. याच पीरियडमध्ये एक क्रेडिट कार्डचे बिल भरायाचे असते. समजा तुम्ही तुम्हाला दिल्या गेलेल्या वेळेत पेमेंट केले नाही किंवा तर, तुमच्या क्रेडिट कार्डवर थेट व्याज सुरू केले जाते. म्हणजेच तुम्हाला व्याजासकट सर्व रक्कम परत करावी लागते. महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्डवर लागणारे व्याज हे ट्रांजेक्शन डेट लागल्यापासून सुरू होते.

वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरल्यावर तुम्हाला अनेक फायद्यांचा अनुभव मिळतो :
क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरणे अत्यंत फायद्याचे ठरू शकते. तुम्ही क्रेडिट कार्डचा बिल वेळेवर भरत असाल तर याचा चांगला परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होताना पाहायला मिळतो. समजा तुम्हाला घर, लग्न समारंभ, किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी लोन काढावं लागत असेल तर, कोणत्याही अडचणी शिवाय चटकन तुम्हाला लोन प्राप्त होईल.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्याची योग्य वेळ कोणती :
तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंट उशिरा करण्यापासून वाचलं पाहिजे. क्रेडिट कार्डवर नकारात्मक प्रभाव आणि जास्तीच्या व्याजापासून वाचण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करू शकता.

1. तुम्हाला वेळेवर बिल पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक पेमेंट पर्याय निवडू शकता.
2. त्याचबरोबर तुम्ही मोबाईल बँकिंग ॲपद्वारे बिल भरून टाकू शकता.
3. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला गरज असणाऱ्या गोष्टींची खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
4. त्याचबरोबर तुम्ही रिमाइंडर सेट करून कमीत कमी पेमेंट करून वेळेवर बिल भरण्याची यशस्वी ठरू शकतात.
5. या उपायांमुळे तुम्ही वेळेवर बिल भरू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर सुधरवण्यास देखील मदत होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Card Bill 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card Bill(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x