6 January 2025 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News

Credit Score

Credit Score | बहुतांश सर्वसामान्य व्यक्ती जास्तीत जास्त सेविंग करू शकत नाही. सामान्य पगारामुळे घर खर्च, आजारपण, मुलांची शिक्षण या सर्व गोष्टींमध्ये चार पैसे बाजूला काढून ठेवण्यास अडचण निर्माण होते. परंतु गरजेवेळी पैसे लागल्यानंतर कोणताही व्यक्ती सर्वप्रथम कर्ज घेण्याचा विचार करतो. कर्ज घेण्यासाठी व्यक्तीचा क्रेडिट स्कोर मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा त्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज बँकेकडून थेट नाकारले जाते.

क्रेडिट स्कोर म्हणजे काय आणि किती असावा :

क्रेडिट स्कोअर हा एक तीन अंकी नंबर आहे. जो 300 ते 900 च्या दरम्यान असताना पाहायला मिळतो. हा नंबर 700 किंवा 750 पर्यंत असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर अत्यंत उत्तम मानला जातो. परंतु तुमचा क्रेडिट स्कोअर 300 ते 500 च्यादरम्यान असेल तर तो अतिशय खराब मानला जातो. या खराब क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला लोन मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारून लोन प्राप्त करायचं असेल, हे 3 उपाय करून पहा. तुमचं काम पटकन होईल.

वेळेवर EMI भरणे :

समजा तुम्ही एखाद्या वस्तूवर कर्ज घेतलं आणि शिल्लक रक्कम भरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लावला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर मोठा परिणाम झाल्याचा आढळतो. समजा तुम्ही EMI भरण्यास जास्तीत जास्त उशीर केला तर, तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस देखील वसूलले जातील.

एकाच वेळी अनेक लोन घेऊ नका :

तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर चांगला बनवायचा असेल तर, एकाच वेळी विविध प्रकारचे लोन घेऊ नका. असं झाल्याने तुम्हाला परतफेड करताना अडचणीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे एकाच वेळी एक लोन घेऊन ते पूर्णपणे फेडा आणि नंतर दुसरं लोन घेऊन फेडा. असं करत करत तुम्ही सेपरेट लोन घेणे फायद्याचे ठरेल.

दीर्घकाळासाठी लोनची निवड करा :

लोन घेणाऱ्या व्यक्तींनी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे लोन घ्या परंतु ते दीर्घकाळ असणे महत्त्वाचे. दीर्घकाळ लोन असल्याने तुम्हाला कमी पैशांचा हप्ता भरावा लागू शकतो. ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार पैसे भरण्यास पात्र ठरू शकता. कमी पैसे असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम भरायला जड जाणार नाही. तुम्ही EMI भरण्यास चुकला नाहीत तर, तुमचा क्रेडिट स्कोअर लवकरात लवकर सुधरेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Score 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

credit score(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x