12 December 2024 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News

Credit Score

Credit Score | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी होम लोन किंवा कार लोन घेतोच. आता लोन घेतलं म्हटल्यावर त्याचे ईएमआयचे हप्ते देखील भरावे लागणार. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊकच असेल की, वेळेवर बिले आणि ईएमआय पेमेंट केलं नाही तर, तुमचा सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर खराब होतो. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा लोन मिळू शकत नाही.

परंतु काही व्यक्तींना अशा देखील समस्या उद्भवल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण बिले वेळच्यावेळी भरून देखील त्यांचा क्रेडिट स्कोर अत्यंत खराब झालेला आहे. अनेकांना या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेलं नाही. आज या बातमीपत्रातून आम्ही सर्व प्रश्नांचे निरासरन करणार आहोत. तर जाणून घ्या योग्य माहिती.

क्रेडिट मिक्स :

तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम आहे की नाही ही बाब अनेक गोष्टींवर निर्भर करते. यामधील एक गोष्ट म्हणजेच क्रेडिट मिक्स. ज्याला आपण सुरक्षित आणि असुरक्षित लोन असं देखील म्हणू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने सुरक्षित पेक्षा असुरक्षित लोन जास्त प्रमाणात घेतले असेल तर, याचा देखील खराब परिणाम क्रेडिट स्कोरवर होताना पाहायला मिळतो. यामधीलच क्रेडिट कार्डवर घेतलेले लोन हे असुरक्षित मानले जाते. त्यामुळे होम लोन आणि कार लोन घ्यायचं असेल तर सुरक्षित कॅटेगिरीमधून घ्या.

पेमेंट सेटलमेंट :

समजा तुम्ही लोन घेतलंय आणि रिपेमेंट करण्यासाठी कमी पैशांत लोन पेमेंट सेटलमेंट केलं असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होताना पाहायला मिळतो. समजा बँकेने तुम्ही रिपेमेंट केलं नसेल आणि तुमच्या लोन पेमेंटवर राईट ऑफ करून पाहिलं तर, याचा चुकीचा प्रभाव क्रेडिट स्कोरवर पडतो.

डिफॉल्ट पेमेंट :

समजा एखाद्या व्यक्तीने घरासाठी होम लोन घेतलं आणि ते पूर्णपणे फेडून टाकलं तरीसुद्धा त्यांचा क्रेडिट स्कोर खराब होत असेल तर, त्यांनी एकदा त्यांच्या मागील उर्वरित पेमेंटवर लक्ष दिले पाहिजे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे पेमेंट बाकी ठेवत असाल तर, याचा थेट वाईट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होताना पाहायला मिळतो.

क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती :

बऱ्याचदा क्रेडिट स्कोर खराब होण्याचे कारण क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती भरल्याने देखील होतो. यामुळे क्रेडिट क्लोजरसाठी खातेधारकाची संपूर्ण माहिती क्रेडिट एजन्सीला मिळत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या पेमेंटवर डिफॉल्ट पेमेंटचा शिक्का मोर्तब होतो. याचा थेट परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर पाहायला मिळतो. आणि म्हणूनच वेळोवेळी तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोर चेक केला पाहिजे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Score Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

credit score(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x