5 November 2024 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

Driving License | ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले, आता मिळणार ही नवी सुविधा, अधिक जाणून घ्या

Driving License

Driving License | जर तुम्ही लवकरच ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते आणि मोटार मंत्रालयाने जुलै 2022 पासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या नव्या नियमानंतर आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणतीही टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. नव्या नियमानंतर आता आरटीओ कार्यालयात जाऊन रांगा लावून परीक्षा देण्याच्या भानगडीत पडावे लागणार नाही.

ही प्रक्रिया गुंतागुंतीची होती :
देशात ड्रायव्हिंग लायसन्स आणि शिकाऊ वाहन परवाना बनवण्याचे नियम वेळोवेळी बदलत राहतात, सरकार ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी नियम बदलत राहते. अलीकडील काही बदलांमुळे परवान्याची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती. काही दिवसांपूर्वीच सरकारने नियमात बदल करून लोकांना त्यांच्या जिल्ह्यातूनच परवाने घेण्यास सांगितले होते. आता सरकारने लोकांना परवाने बनवण्याची प्रक्रिया थोडी शिथिल केली आहे.

प्रशिक्षण केंद्राची भूमिका ठरणार महत्त्वाची :
सरकारच्या नव्या नियमानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेत आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशी सर्व प्रशिक्षण केंद्रे राज्य परिवहन प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणार आहेत, आता जर कोणाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर त्याला प्रथम प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र घ्यावे लागेल. आता लोकांना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागेल, प्रवेशासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर तुमचे प्रशिक्षण सुरू केले जाईल. प्रशिक्षणानंतर तुम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्रासह ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. आरटीओमध्ये जाऊन कोणतीही टेस्ट द्यावी लागणार नाही.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज :
नव्या नियमानंतर आता प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारेच लोकांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येणार आहे. लोकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून चाचण्या द्याव्या लागणार नाहीत. प्रशिक्षणादरम्यान, लोकांना रहदारी आणि वाहन चालविण्याशी संबंधित सिद्धांत आणि प्रॅक्टिकल दोन्ही शिकवले जातील. प्रशिक्षण केंद्रे सर्व अत्याधुनिक मानकांनी सुसज्ज असतील. येथे सर्व प्रकारचे ट्रॅक आणि उपकरणे उपलब्ध असतील. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला 1 महिन्यात 29 तासांचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Driving License rules changed now new facility will be available check details 17 July 2022.

हॅशटॅग्स

#Driving License(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x