22 November 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार

EPF on Salary

EPF on Salary | बहुतांश व्यक्ती खाजगी नोकरी करतात. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कायम त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते. गव्हर्नमेंट सर्विस करणाऱ्या व्यक्तींना रिटायरमेंटनंतर निवृत्ती पेन्शन सुरू होते. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला साथ देते. परंतु खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं असं नसतं.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता सतावते. रिटायरमेंट नंतरच आयुष्य कसं जाईल याची काळजी त्यांना कायमच असते. प्रत्येक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला EPS म्हणजेच ‘एम्पलोयी पेन्शन स्कीम’ ईपीएफओ अंतर्गत रिटायरमेंट फंड तयार होण्यासाठी एक भाग प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

EPS पेन्शनचे नियम जाणून घ्या :
1. ईपीएस खात्यात जमा होणारा पीएफ बेसिक सॅलरी आणि DA अशा पद्धतीने मोजला जातो. आपण असं समजून की, त्या व्यक्तीला संपूर्ण मिळून 15,000 रुपये पगार आहे.
2. पेन्शनसाठी जास्तीत जास्त सर्विस 35 वर्षापर्यंत दिली गेली आहे.
3. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोणताही कर्मचारी 58 वर्षानंतर पेन्शनवर हक्क सांगू शकतो.
4. कर्मचाऱ्याला ईपीएस पेन्शन 1000 रुपये असून, सुविधेसाठी कोणत्याही कंपनीत 10 वर्षांची नोकरी करणे गरजेचे आहे.
5. कर्मचाऱ्यासाठी 50 वर्षानंतर आणि 58 वर्षाआधी देखील पेन्शन घेण्यासाठी ऑप्शन दिले जातात. यासाठी फॉर्म 10D भरून द्यावा लागतो.

अशा पद्धतीने खात्यात पैसे जमा होतात :
प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पीएफ बेसिक सॅलरी + ( DA ) मधील बारा टक्के अमाऊंट खात्यामध्ये जमा केला जातो. कर्मचाऱ्या एवढेच योगदान कंपनी आणि नियुक्तांकडून केले जाते. यामधील 8.33% ईपीएस खात्यात आणि
3.67% पीएफ खात्यात जमा केले जातात. म्हणजेच काय तर, कर्मचाऱ्याकडून केवळ एकच भाग जमा केला जातो आणि कंपनी आणि नियुक्तांकडून एका भागाचे दोन वेगवेगळे भाग करून खात्यात भरले जातात.

EPS फॉर्मुला समजून घ्या :
ईपीएस फॉर्मुला म्हणजेच (बेसिक सॅलरी × पेन्शनबल सर्विस/70). आता पेन्शनबल सर्विस ही 35 वर्षांची आहे तर, ईपीएस कॅल्क्युलेशन पहा. (15,000×35/70=7,500). याचाच अर्थ असा की, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 7,500 रुपयांची मंथली पेन्शन सुरू राहील. त्याचबरोबर हा ईपीएस फॉर्मुला 1995 सालानंतर खाजगी क्षेत्रात लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे.

Latest Marathi News | EPF on Salary 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF on Salary(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x