4 December 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
x

EPF Withdrawal | पगारदारांनो चिंता मिटली; आता EPF खात्यातील पैसे ATM मधून काढता येणार, नवीन अपडेट जाणून घ्या

EPF Withdrawal

EPF Withdrawal | असंघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे EPFO ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन’. ईपीएफओ ही एक अशी संस्था आहे जी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातील एक भाग पीपीएफ खात्यात तर दुसरा भाग इपीएस खात्यामध्ये गुंतवत असते. ज्यामुळे कर्मचारी दीर्घकाळामध्ये मोठा निधी जमा करू शकतो. दरम्यान केंद्र सरकार ईपीएफओ संघटना सुधारवण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. नेमके कोणकोणते बदल होण्याची शक्यता आहे पाहूया.

सरकार EPFO 3.0 ची घोषणा करू शकते :

मोदी सरकारकडून ईपीएफओ खात्याशी निगडित सर्वात मोठी घोषणा लवकरात लवकर केली जाऊ शकते. ज्यामध्ये सरकार ‘ईपीएफओ 3.0’ या सुधारित संस्थेची घोषणा करू शकतो. आतापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पगारामधील 12% भाग गुंतवायला लागायचा ही 12% टक्क्यांची मर्यादा लवकरात लवकर हटवली जाऊ शकते अशी माहिती माध्यमांकडून समजत आहे.

समजा ईपीएफधारक कर्मचाऱ्यांसाठी 12% भाग जमा करण्याची मर्यादा हटवली गेली तर, ईपीएफओ कर्मचारी खात्यामध्ये त्याला हवे तेवढे योगदान करू शकणार आहे. सरकारकडून 12% ची मर्यादा लवकरात लवकर रद्द केली जाऊ शकते. सरकारच्या नव्या धोरणाच्या शक्यतेनुसार प्रत्येक कर्मचारी त्याच्या इच्छेनुसार, बजेटनुसार आणि बचतीनुसार ईपीएफ खात्यात योगदान देऊन जास्तीत जास्त बचत करू शकतो. हे एकमेव उद्दिष्टे यामागचे सांगितले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नियोक्तांकडून होणाऱ्या योगदानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आहे. या सर्व बाबींवर कामगार मंत्रालय वाऱ्याच्या वेगाने कार्यरत असल्याचं समजत आहे.

ATM मधून पीएफ काढता येईल :

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी देखील माहिती समोर आली आहे की, लवकरच सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामध्ये ईपीएफ खात्यातील पैसे एटीएममधून काढता येण्याचा ट्विस्ट देखील शामिल असणार असल्याची शक्यता आहे.

यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड प्रमाणेच एटीएम कार्ड दिले जाऊ शकते. ज्या एटीएम कार्डमधून तुम्ही ईपीएफ खात्यातील पैसे अगदी सहजरीत्या एटीएममार्फत काढू शकता. ही सुविधा लागू झाली की, कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातील 50% रक्कम एकाच वेळी काढून घेऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार EPFO 3.0 चे लॉन्चिंग नूतन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये करणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे.

IT प्रणालीत सुधारणा केली जाऊ शकते :

मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालय आयटी प्रणालीमध्ये देखील लवकरात लवकर सुधारणा करून कर्मचाऱ्यांना पैसे काढण्याचा मार्ग मोकळा करून देणार असल्याचं समजत आहे. तर, कामगार मंत्रालयाच्या सुरू असलेल्या तयारीमध्ये 2 टप्प्यात सुधारणा केली जाऊ शकते. ज्यामध्ये EPFO 2.0 शामिल असून 2024 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये याचे निरासरण होण्याची शक्यता वाटत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF Withdrawal on ATM 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Withdrawal(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x