EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, EPF चे पैसे ATM मधून झटपट काढू शकता, अपडेट जाणून घ्या

EPFO Money Alert | केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) लवकरच “ईपीएफओ 3.0 आवृत्ती” सुरू करणार आहे, ज्यामुळे ईपीएफओ सदस्यांना एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळेल.
याव्यतिरिक्त, त्यांना इतर अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळतील. ईपीएफओच्या तेलंगणा विभागीय आणि प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री मांडविया म्हणाले की, “ईपीएफओ 3.0 आवृत्ती” बँकिंग प्रणालीच्या समकक्ष असेल.
‘ईपीएफओ’चे सदस्य हवे तेव्हा एटीएममधून पैसे काढू शकतात
येत्या काही दिवसांत ईपीएफओचे व्हर्जन 3.0 येत आहे. म्हणजेच ईपीएफओ बँकेसारखा होईल. बँकेच्या व्यवहाराप्रमाणेच तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) असेल आणि तुम्ही तुमची सर्व कामे करू शकाल. हे तुमचे पैसे आहेत, तुम्ही हवे तेव्हा ते काढू शकता.
ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही
केंद्रीय मंत्री म्हणाले, ‘तुम्हाला अजूनही ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या काही दिवसांत तुम्हाला हवं तेव्हा एटीएममधून पैसे काढता येतील. आम्ही ईपीएफओमध्ये अशा सुधारणा करत आहोत. ईपीएफओ प्लॅटफॉर्ममध्ये झपाट्याने बदल होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी निधी हस्तांतरण, क्लेम ट्रान्सफर आणि ईपीएफओ डेटाबेसमध्ये नोंदणीकृत सदस्यांच्या नावांमध्ये सुधारणा, तसेच कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा यासह लाभार्थ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांचा ही उल्लेख केला.
ईपीएफओ 3.0 म्हणजे काय?
यावर्षी मे-जूनपर्यंत ईपीएफओ 3.0 अँप लाँच करण्याची सरकारची योजना आहे. या अँपच्या आगमनामुळे ईपीएफओ च्या सदस्यांना त्यांचे पीएफ स्टेटस तपासणे, निधी हस्तांतरित करणे किंवा दाव्यांचा निपटारा करणे सोपे होणार आहे. सध्या पीएफचे पैसे काढण्यासाठी बराच वेळ लागतोच, शिवाय ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या निधीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर घसरला, शेअर Hold करावा की Sell - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांकडून सकारात्मक संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, मार्केट तज्ज्ञांनी दिले अपसाईड तेजीचे सकारात्मक संकेत - NSE: IREDA
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर घसरला, 6 महिन्यात 36 टक्के घसरला, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: RVNL
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
TATA Steel Share Price | टाटा स्टीलमध्ये तेजीचे संकेत, ऍक्सिस ब्रोकरेज बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर 46 रुपयांवर आला, 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL