14 November 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC EPF Contribution Limit | पगारदारांसाठी आनंदाची बातमी; आता आधीपेक्षा जास्त बचत होईल, EPF ची अधिक रक्कम मिळणार Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News
x

EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर

EPFO Monthly Pension

EPFO Monthly Pension | PPO हा 12 अंकी नंबर असतो. जो पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून बरेच पेन्शन लाभार्थी आपलं जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास जुपले आहेत.

80 वर्षांपुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची तारीख 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आता सर्व पेन्शन धारकांसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर सांगितली गेली आहे. 30 नोव्हेंबरच्या आत सर्व पेन्शन लाभार्थ्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करावे. त्याचबरोबर पीपीओ नंबर हा देखील पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हा 12 अंकी नंबर आयडेंटिफिकेशन कोड प्रमाणेच काम करतो.

PPO नंबर विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या :

पीपीओ नंबर हा एक बारा अंकी नंबर असून सर्व प्रकारचे ट्रांजेक्शन आणि कम्युनिकेशनसाठी एका रेफरन्सप्रमाणे काम करतो. बारा अंकांच्या या पीपीओ नंबरामधील पहिले 5 नंबर अधिकाऱ्याचा कोड दर्शवते. त्यानंतरचे 2 अंक सुरू करण्याचे वर्ष दर्शवते. पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा करताना त्याचबरोबर पेन्शन काढताना किंवा पेन्शन संबंधित इतर कोणत्याही गोष्टीसाठी पीपीओ नंबर हा महत्त्वाचा असतो.

सोप्या पद्धतीने मिळवा पीपीओ नंबर :

1. सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
2. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये एंटर करून फॉर एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स पोर्टल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
3. आता संपूर्ण डिटेल्स ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीओ नंबर शोधायचा आहे.
4 समोर असलेल्या स्क्रीनवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून पीपीओ नंबर घ्यायचा आहे.
5. तुमचा पीपीओ नंबर तिथेच असेल जिथे तुमचे बँक खात्याचे आणि पीएफ खात्याचे नंबर उपलब्ध असतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Monthly Pension 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Monthly Pension(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x