27 January 2025 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल

EPFO New Rule

EPFO New Rule | ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ अंतर्गत होणाऱ्या पीएफ अकाउंट त्याचबरोबर पेन्शन अकाउंटचे काम ईपीएफओच करते. ईपीएफओ कायम आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असते. आता देखील काही नियमानमध्ये बदल केले आहेत. आता कर्मचाऱ्याला कोणत्याही कागदपत्राशिवाय आपले स्वतःचे अकाउंट अपडेट करता येणार आहे. अपडेटविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

ईपीएफओ सिस्टम अपडेट :

1. ईपीएफओमध्ये झालेल्या मोठ्या अपडेटमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे नाव, तुमच्या नवऱ्याचे नाव, तुमची जन्मतारीख, लिंग, वय, लग्नाचा दाखला यांसारखी इतरही माहिती अगदी सहजपणे एडिट करू शकणार आहात.

2. म्हणजेच काय तर तुम्ही अगदी कोणत्याही कागदपत्राशिवाय तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न वापरता बदलू शकणार आहात.

3. या सुविधेचा लाभ ज्या व्यक्तींच्या आधार कार्डला त्यांचा UAN क्रमांक लिंक आहे असे व्यक्ती कोणत्याही कागदपत्राचा वापर न करता आपली वैयक्तिक माहिती बदलू शकणार आहेत.

4. सध्या इतर कोणते बदल असतील तर, यासाठी एकूण 28 दिवसांचा कालावधी लोटला जातो. त्याचबरोबर तुमच्या खात्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

5. तुम्हाला रक्कम काढून घ्यायची असेल तर, हे अपडेट माहित असणे गरजेचे आहे आणि कशा पद्धतीने हाताळायचे हे देखील माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. विथड्रॉ करण्यासाठी तुमच्या खात्याला आधार आणि पॅनल लिंक असणे महत्त्वाचे आहे.

6. बऱ्याच ईपीएफओ सदस्यांना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लिंक संबंधित तक्रारी असतात. एवढेच नाही तर प्रोफाइल आणि केवायसीची देखील तक्रार पाहायला मिळते. परंतु या अपडेटमुळे सदस्यांच्या सर्व तक्रारी कायमच्या बंद होतील.

ईपीएफओ प्रोफाइल अपडेट कसे कराल :

1. सर्वप्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन तुमचा UAN क्रमांक त्याचबरोबर पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.

2. पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी चेंज करायचा आहेत त्या टॅबवर क्लिक करून च्या गोष्टी अपडेट करायच्या आहेत त्या देखील क्लिक करायचे आहेत आणि मॉडीफाय बेसिक डिटेल्सवर देखील क्लिक करायचे आहे.

3. तुम्हाला जी माहिती बदलायची आहे ती चेंज करून घ्यायची आहे. माहिती बदलत असणार नाही गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या आधार कार्डवरील आणि ईपीएफवरील संपूर्ण माहिती सारखीच असावी. त्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला त्याचबरोबर आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करायचे आहे.

ईपीएफ प्रोफाइल अपडेट स्टेप्स

स्टेप 1
सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ युनिफाइड मेंबर पोर्टलवर जा.

स्टेप 2
लॉग इन करण्यासाठी आपला यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

स्टेप 3
त्यानंतर मेनूमधील ‘मॅनेज’ टॅबवर क्लिक करा.

स्टेप 4
वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी ‘मॉडिफाई बेसिक डिटेल्स’ हा पर्याय निवडा.

स्टेप 5
आपल्या आधार कार्डसह सर्व आवश्यक माहिती भरा.

स्टेप 6
आवश्यक असल्यास सहाय्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा जन्म दाखला) अपलोड करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO New Rule Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO New Rule(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x