25 December 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

EPFO Online Claim | पगारदारांनो, रिजेक्ट होऊ शकतो तुमचा EPF विड्रॉल क्लेम, ऑनलाईन अर्जावेळी या गोष्टींची काळजी घ्या

EPFO Online Claim

EPFO Online Claim | कर्मचारी भविष्य निधी संघटन हे भारत सरकारच्या अंतर्गत चालणारी एक पेन्शन योजना आहे. ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्याची पेन्शन निधी प्रत्येक महिन्याला त्याच्या खात्यामध्ये जमा होते. ईपीएफ खात्याचा जमा केलेले पैसे तुम्ही गरजेवेळी काढू देखील शकता. परंतु बऱ्याचदा तुमच्या ईपीएफ खात्यातून पैसे निघण्यास काही अडचणी निर्माण होतात. ते अडचणींमुळे तुम्हाला गरजेवेळी स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाहीत. याची नेमकी कोणती कारण असू शकतात पाहून घेऊया.

1) चुकीची केवायसी :
समजा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ खात्यातून पैसे काढत असाल आणि पैसे काढताना तुम्हाला एरर दाखवत असतील तर, तुम्ही चुकीची केवायसी डॉक्युमेंट कमेंट केले असतील. जर तुम्ही अर्धवट कागदपत्रे दिली असतील तर, तुम्ही ऑनलाईन विथड्रॉ क्लेम करू शकणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम केवायसी संबंधित सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या.

2) विथड्रॉ नियमांचे पालन न करणे :
पैसे काढण्याच्या नियमांचे व्यवस्थित पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की, फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 31 या फॉर्ममधील फरक तुम्हाला माहित असायला हवा. फॉर्म 19 हा शेवटचे निपटन करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर फॉर्म 10C हा पेन्शनचे पैसे काढण्यासाठी केला जातो तर, फॉर्म 31आंशिक काढतीसाठी केला जातो.

3) UAN नंबर आधार कार्डशी लिंक न करणे :
तुमचा UAN नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर, तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाही. त्यामुळे सर्वातआधी तुमचा युएएन नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या.

तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढताना दिलेली सर्व माहिती चुकीची दाखवत असतील किंवा काही कागदपत्रे चुकीची दाखवत असतील तर, तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन क्रॉस चेक करावी लागेल. ज्यामध्ये तुमचं नाव, नंबर, आधार कार्ड नंबर त्याचबरोबर इतर सर्व महत्त्वाची माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्यावी लागेल.

असे काढू शकता ईपीएफ खात्यातून पैसे :
ईपीएफमध्ये जमा झालेली रक्कम तुम्ही पूर्ण किंवा आंशिक स्वरूपात काढू शकता. समजा एखादा कर्मचारी रिटायर झाला असेल किंवा 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ घरात बसला असेल तर, ईपीएफ खात्यातून पैसे काढले जाऊ शकतील. त्याचबरोबर लग्न समारंभ, शैक्षणिक खर्च किंवा मेडिकल इमर्जन्सीसाठी देखील तुम्ही एपीएफ खात्यातून पैसे काढू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Online Claim 27 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Online Claim(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x