26 December 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
x

EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे

EPFO Passbook

EPFO Passbook | कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफच्या माध्यमातून पेन्शनप्राप्ती होत असते. अशातच कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातील एक ठराविक रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. बऱ्याच व्यक्तींना त्यांच्या ईपीएफ खात्यातील शिल्लक रक्कम कशा पद्धतीने चेक करता येईल याबद्दल काहीही माहिती नसते. तुम्हाला सुद्धा तुमच्या ईपीएफ खात्यातील बॅलन्स चेक करायचा असेल तर, अभी तुम्हाला एकूण 4 प्रकार सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही अगदी सहजपणे खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.

थेट ईपीएफओ पोर्टलवरून बॅलन्स चेक करा :

बऱ्याच व्यक्ती ईपीएफओच्या ॲपद्वारे बॅलन्स चेक करतात. तुम्हाला ॲपद्वारे बॅलन्स चेक करायचा नसेल तर, तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओ पोर्टलवर जाऊन एम्प्लॉई सेक्शनवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर मेंबर पासबुकवर क्लिक करून पासवर्ड आणि तुमचा युएएन नंबर टाकून पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करता येईल.

ॲपद्वारे बॅलन्स चेक करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या :

तुम्ही ॲपद्वारे देखील अगदी सोप्या पद्धतीने बॅलन्स चेक करू शकता. यासाठी तुम्हाला उमंग ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. केवळ बॅलेन्सच नाही तर, तुम्ही पीएफ निगडित कोणतीही गोष्ट चेक करू शकता. पासबुक, क्लेम्स ट्रॅक देखील करू शकता. केवळ याकरिता तुमचा मोबाईल नंबर उमंग ॲपला रजिस्टर असला पाहिजे.

SMS ने देखील करू शकता ईपीएफ खात्यातील बॅलन्स चेक :

तुम्ही 7738299899 या क्रमांकावर एसएमएस म्हणजेच मेसेज पाठवून देखील तुमचा ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. त्यासाठी हा मेसेज पाठवताना तुम्हाला रजिस्टर असलेल्या क्रमांकावरून पाठवायचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला AN EPFOHO ENG ईएनजी हा शब्द तुमच्या इंग्रजी भाषेला दर्शवण्यासाठी लिहिला जातो. हा मेसेज टाईप करून तुम्हाला पाठवावा लागेल.

केवळ एक मिसकॉल देऊन करू शकता बॅलन्स चेक :

प्रत्येकाच्याच घरात इंटरनेटची तगडी सुविधा उपलब्ध नसते. अशा व्यक्ती केवळ एक मिसकॉल देऊन देखील स्वतःचा ईपीएफ बॅलेन्स चेक करू शकतात. यासाठी तुम्ही ज्या क्रमांकावरून फोन कराल तो क्रमांक युएएनला रजिस्टर असला पाहिजे. रजिस्टर असलेल्या नंबरने तुम्हाला 9966044425 या क्रमांकावर मिसकॉल द्यायचा आहे. मिसकॉल दिल्यानंतर लगेचच तुमच्या फोनवर एक एसएमएस पाठवण्यात येईल. यामध्ये संपूर्ण डिटेल्स लिहिलेल्या असतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 17 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x