30 October 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL आणि TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH Horoscope Today | पुढच्या दिवाळीपर्यंत या राशींसाठी आर्थिक भरभराटीचा काळ सेल, करावा लागेल एक जबरदस्त उपाय Anushka Sen | अवघ्या 22 वर्षांत अभिनेत्रीने घराची स्वप्नपूर्ती केली साकार, गृहप्रवेशाचे फोटोज शेअर करत म्हणाली - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF कापला जाणाऱ्या आणि रु.10,000 बेसिक सॅलरी असणाऱ्यांना मिळणार 1,98,54,875 रुपये - Marathi News Post Office Scheme | दर 3 महिन्यांनी 10,250 रुपये देईल ही योजना, प्लस मॅच्युरिटीला 7,05,000 रुपये मिळतील, फायदा घ्या - Marathi News EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पडलेला प्रश्न, नोकरी करताना EPF पेन्शन मिळेल का, फायद्याचा नियम देईल पेन्शन
x

EPFO Passbook | पगारातून EPF कापला जाणाऱ्या आणि रु.10,000 बेसिक सॅलरी असणाऱ्यांना मिळणार 1,98,54,875 रुपये - Marathi News

EPFO Passbook

EPFO Passbook | नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतरचं आयुष्य आनंदात आणि समाधानी जावं यासाठी तुम्हाला आत्तापासूनच इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायला हवी. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये देखील गुंतवणुकीचे विविध पर्याय तुम्हाला सापडतील. तुम्ही तिथे गुंतवणूक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात तिथे तुमचा पीएफ कापला जात असतो. म्हणजे तो साईड बाय साईड का होईना पण प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम बचतीसाठी बाजूला पडते.

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. या संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट नंतरची सर्व प्रोसेस, त्यांचे पेन्शन सर्वकाही या संस्थेमार्फत होत असते. ईपीएफच्या माध्यमातून तुम्ही भडगंज रक्कम कमावू शकता. यासाठी गरजेचं नाही की, तुमचा पगार लाखोंच्या घरात असो. समजा एखाद्या व्यक्तीला केवळ 10,000 हजार रुपये बेसिक सॅलरी असेल तरीसुद्धा तो व्यक्ती रिटायरमेंटपर्यंत मोठी रक्कम साठवू शकतो.

अशा पद्धतीने काम करते ईपीएफओ स्कीम :
ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातील 12% रक्कम पीएफ खात्यात जमा होते. जेवढे रक्कम कर्मचाऱ्याकडून जमा होते तितकेच रक्कम कंपनी त्याचबरोबर नियुक्तांकडून देखील केली जाते. कंपनी 12 टक्क्यांतील 8.33% कर्मचाऱ्यांच्या पेन्शन स्कीममध्ये तर, 3.67% प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केले जातात.

ईपीएफ पेन्शनचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते :
ईपीएफ पेन्शनचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी एलिजिबिलिटी असणे गरजेचे आहे. 20 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या फॉर्मस सेक्टरला ईपीएफओला रजिस्टर असणे गरजेचे आहे. ईपीएसओ संस्थेला रजिस्टर केल्यानंतरच नोकरीवर असणारे कर्मचारी ईपीएफ खात्यात पैसे जमा करण्यास पात्र ठरतात.

कर्मचारी ईपीएफ खात्यातून क्लेम कधी करू शकतो :
समजा तुम्ही रिटायरमेंट झाला असाल किंवा नोकरी सोडत असाल तर, ईपीएफ फंडामधील पैसे वापरू शकता. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नॉमिनीला ईपीएफ खात्यातील सर्व पैसे मिळतात.

10,000 च्या बेसिक सॅलरीवर 2 करोडचा फंड कसा तयार होईल :
समजा एक 23 वर्षीय तरुण आहे आणि त्याला 40,000 हजार रुपये एवढा टोटल पगार आहे. त्या टोटल पगारातील 10,000 हजार बेसिक सॅलरी आहे तर, उपलब्ध असलेल्या 8.25% व्याजदराने कर्मचाऱ्याला किती पैसे मिळतील जाणून घेऊ. कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये 60 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षाला 10% वाढीची अवस्था आहे असं समजूया. म्हणजेच कर्मचारी एकूण 37 वर्षांमध्ये खात्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करणार.

1. कर्मचाऱ्याचे वय 23 वर्ष
2. नोकरीचे वर्ष 37 आणि 60 वर्षापर्यंतची रिटायरमेंट
3. मंथली कॉन्ट्रीब्यूशन 1,200 रुपये, कर्मचारी आणि कंपनीकडून होणारे योगदान 367 = 1,567
4. वार्षिक वेतन वाढ 10%
5. 37 वर्षांत एकूण जमा झालेली रक्कम 68,46,018 रूपये
6. या रकमेवर मिळणारे व्याज 1,30,08,857
7. म्हणजेच एकूण 37 वर्षांमध्ये तुमच्या हातात मॅच्युरिटी अमाऊंट 1,98,54,875 रुपये एवढी असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x