29 January 2025 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या

EPFO Passbook

EPFO Passbook | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कायम नवनवीन अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील कोटी EPFO ग्राहकांसाठी एक अत्यंत मोठी अपडेट घेऊन आले आहेत. ज्यामध्ये EPFO 3.0 PF चे नवे नियम जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. ईपीएफओमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांच्याद्वारे मिळत राहते.

आता लवकरात लवकर ईपीएफओ 3.0 लॉन्च केले जाणार आहे. ज्याचा फायदा ईपीएफ अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही सुविधा कर्मचाऱ्यांना युजर फ्रेंडली अनुभव देण्यास मदत करणार आहे. कारण की यामधून थेट पीएफचे पैसे ATM च्या माध्यमातून काढता येणार आहेत. या सुविधेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एटीएम दिले जाईल. या एटीएममुळे पीएफ खात्यातील पैसे अगदी सहजपणे काढणे शक्य होणार आहे.

ईपीएफओचे नवीन मोबाईल ॲप कधी लॉन्च होणार :
केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार 2025 या नववर्षाच्या जून महिन्यामध्ये ईपीएफओ 3.0 एटीएम कार्डचे प्रगत सॉफ्टवेअर घेऊन येणार आहे. यामध्ये अशी ही माहिती समोर आली आहे की श्रम मंत्रालय 12% योगदानाची मर्यादा काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ईपीएफओ 3.0 चे उद्दिष्टे काय आहे :
1. ईपीएफओ 3.0 ची सुविधा आणून आपल्या ग्राहकांना पारदर्शक तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो आणि हाताळला जातो याबद्दल सतर्क बनवणार आहे.

2. त्याचबरोबर ईपीएफओकडून लॉन्च होणाऱ्या 3.0 या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना केवळ अनुभवच नाही तर, त्यांचे आर्थिक व्यवस्थापन देखील मजबूत बनणार आहे.

3. ईपीएफओ या व्यवस्थापनाची सुविधा आपल्या ग्राहकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देईल. तरी बहुतांश कर्मचारी ईपीएफओ 3.0 ही सुविधा वापरण्यास आतुर झाल आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook Monday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x