19 February 2025 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | 'या' 5 चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोर कधीच सुधारणार नाही, पुढील टिप्स फॉलो करा अन्यथा कर्ज घेणे विसरा SBI Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, ही SBI फंडाची योजना 1 लाखांवर देईल 1,50,81,081 रुपये परतावा WhatsApp Update | आता व्हाट्सअप थीममध्ये मिळणार रंगीबेरंगी फीचर्स, एका क्लिकवर फीचर्स असे सेट करा HDFC FD Interest Rates | HDFC बँकेच्या एफडीमध्ये 33,750 रुपये केवळ व्याजाने मिळतील, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | पत्नीच्या नावाने पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा, मिळेल भरभरून लाभ, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Realme P3x 5G | 'हा' ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करा केवळ 15,000 रुपयांत, मिळेल प्रीमियम लेदर आणि डिझाईन देखील नवीन IRFC Share Price | मल्टिबॅगर आयआरएफसी शेअरबाबत मोठे संकेत, शेअर प्राईस 50 रुपयांपर्यंत घसरणार का - NSE: IRFC
x

EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट

EPFO Passbook

EPFO Passbook | पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पीएफ प्रत्येक महिन्याला त्याच्या ईपीएफ खात्यामध्ये जमा होत राहतो. अशातच खातेधारकावर एखादा आर्थिक प्रसंग ओढावल्यामुळे पैसे काढावे लागतात आणि आपल्या गरजा भागवाव्या लागतात. परंतु बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नाही की, ईपीएफ खातेदार एकाच वेळी पीएफ खात्यातील किती रक्कम काढू शकतो. चला जाणून घेऊया.

कोणत्या गोष्टीसाठी 3 वेळा ऍडव्हान्स पैसे काढता येतात :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओ हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड असून कर्मचारी त्याचबरोबर कंपनी देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये योगदान देत असते. याला आपण प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ असं म्हणतो. बऱ्याच व्यक्ती पैसे का काढत आहे उद्याचे कारण देऊन आधीच अर्ज करून ठेवतात.

दरम्यान ईपीएफ खातेधारक शिक्षणासाठी त्याचबरोबर लग्न करण्यासाठी वर्षभरातून जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढू शकतो. ज्या व्यक्तीजवळ ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी 7 वर्षांची सदस्यता आहे तोच व्यक्ती हे काम करू शकतो. याबाबतचे सर्व नियम तुम्हाला ठाऊक असणे अत्यंत गरजेचे आहे.

उपचार करण्यासाठी पैसे काढण्याची मुभा :
कर्मचाऱ्यावर अचानक आजारी पडण्याची वेळ आली किंवा आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर, त्याला त्याच्या योगदानाच्या सहापट रक्कम काढता येते. म्हणजेच एक पीएफ अकाउंट होल्डर स्वतःच्या खात्यातून 1 लाखांची रक्कम काढू शकतो.

जुन्या घराच्या डागडुजीसाठी :
ईपीएफओ आपल्या खातेधारकांसाठी कायम नवनवीन सुविधा आणतो. यामधील पैसे काढण्याच्या नियमांमध्ये जुन्या घराची डागडुजी करण्यासाठी देखील पैसे काढण्याची अनुमती दिली जाते. परंतु यामध्ये आणखीन एक अट आहे ती म्हणजे डागडुजीसाठी काढले जाणारे पैसे हे केवळ त्या व्यक्तीच्या किंवा त्याच्या पत्नीच्या त्याचबरोबर संयुक्त म्हणजेच दोघांच्याही नावे घर असेल तर रक्कम काढता येऊ शकते.

गृह कर्ज भरण्यासाठी :
पीएफ खातेधारक त्याने कर्ज काढून घेतलेल्या घराचे हफ्ते थकल्यानंतर पीएफमधून पैसे काढून भरू शकतो. अशा परिस्थितीत पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कर्मचारी जमा रक्कमेच्या 90% रक्कम अगदी आरामात काढू शकतो. यासाठी देखील ईपीएफओने अट ठेवली आहे ती म्हणजे पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये किमान 3 वर्षांचे योगदान दिलेले असावे.

एखाद्यातून पैसे काढण्याची आवश्यक कागदपत्रे कोणती :
पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी UAN म्हणजेच ‘युनिव्हर्सल अकाउंट नंबर’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुमच्याकडे नसल्यास तुम्ही कंपनीकडून हा नंबर नक्कीच मिळवू शकता. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुमच्या बँकेच्या तपशिलावरची संपूर्ण माहिती व्यवस्थित असावी. तुम्हाला नियमांमध्ये कोणत्याही प्रकारची शंका आढळल्या ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व नियमांची पुरेपूर माहिती घ्यावी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x