22 November 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News

EPFO Pension

EPFO Pension | ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ ही संस्था खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त रोजगार म्हणजेचं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन स्वरूपात प्राप्त करते. पीएफ खात्यात तुमच्या पगारातील एक भाग जमा केला जातो. कर्मचाऱ्यांच्या योगदान एवढेच कंपनीकडून योगदान होत असते. ज्यामुळे पीएफ फंड मजबूत बनण्यास मदत होते.

EPFO बद्दल हे नियम जाणून घ्या :
1. ईपीएफओ अंतर्गत पेन्शन प्राप्ती करण्यासाठी कर्मचाऱ्याचे ईपीएफ खाते उघडलेले असावे.
2. केंद्राच्या निवृत्ती वेतन नियमानुसार निवृत्ती होऊन पेन्शन प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने कंपनीमध्ये किमान 10 वर्ष काम केलेलं असावं.
3. ईपीएफ म्हणजेच कर्मचारी निवृत्ती वेतनाअंतर्गत असलेल्या संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वय 58 पूर्ण असणे गरजेचे आहे. 58 वय पूर्ण झाल्यानंतरच कर्मचाऱ्याला पेन्शन प्राप्ती होते.

अशी मोजली जाते पेन्शनची रक्कम :
सर्वप्रथम आपण पेन्शनची रक्कम मोजण्याचे एक सोपे सूत्र पाहून घेऊ. हे सूत्र ‘(पेन्शन= पेन्शनचा पगार म्हणजेच गेल्या 60 महिन्यांची सरासरी × पेन्शन पात्र सेवा/70)’. या सूत्रावरूनच आपल्याला पेन्शनची मोजणी करायची आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे वय 23 वर्ष आहे आणि त्याने त्याच वर्षी पेन्शन प्राप्तीसाठी नाव नोंदणी केली असेल आणि त्याला 58 व्या वर्षी सेवानिवृत्त करण्यात आलं असेल, त्याचबरोबर तो व्यक्ती 15,000 हजार रुपयांच्या वेतनमर्यादे अंतर्गत योगदान देत असेल तर, त्याला एकूण 35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन प्राप्ती होईल. कॅल्क्युलेशननुसार कर्मचाऱ्याला दरमहा 7,500 रुपयांची पेन्शन मिळू शकते.

पेन्शनसाठी असणारी पात्रता जाणून घ्या :
1. पेन्शन प्राप्त करण्यासाठी सदस्याला कंपनीमध्ये कामाचे योगदान एकूण 10 वर्ष करणे गरजेचे आहे.
2. ईपीएफ सदस्याला निवृत्तीपर्यंतचे 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते.
3. त्याचबरोबर 58 वर्ष उलटून गेल्यानंतरही तो व्यक्ती काम करत असेल तर तो पेन्शन प्राप्तीसाठी पात्र असतो.
4. कंपनीमध्ये 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्ती 58 वर्ष होण्याआधी देखील काही नियमांचे पालन करून पेन्शन प्राप्तीसाठी पात्र ठरू शकतो.
5. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यानंतर पेन्शनचे सर्व पैसे कर्मचाऱ्याच्या पतीला किंवा पत्नीला देण्यात येतात.
6. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या 2 मुलांना 25 होय होईपर्यंत पेन्शन मिळते. त्याचबरोबर कुटुंबामध्ये अपंग मुले असल्यास 2 मुलांना पेन्शन व्यतिरिक्त आजीवन अपंग निवृत्ती वेतन देखील मिळते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Pension(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x