5 February 2025 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या EPFO Passbook | खाजगी पगारदरांनो इकडे लक्ष द्या, EPF रक्कमेवर मिळणार अधिक व्याज, ईपीएफओ अपडेट जाणून घ्या IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, पटापट प्राईस बँड सह इतर डिटेल्स जाणून घ्या MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
x

EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना पडलेला प्रश्न, नोकरी करताना EPF पेन्शन मिळेल का, फायद्याचा नियम देईल पेन्शन

EPFO Pension

EPFO Pension | संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ अंतर्गत पेन्शन प्राप्ती तसेच विविध सवलती मिळतात. दरम्यान ठराविक वर्षांपर्यंत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला साठवलेल्या पीएफमधून प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणे सुरू होते. अशातच अनेक कर्मचाऱ्यांना असा प्रश्न बऱ्याच वेळा पडला आहे की, नोकरीवर असतानाच पेन्शन प्राप्त होऊ शकते का. आज आपण याविषयीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ईपीएफओ ही संस्था संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर म्हातारपणाचे दिवस घालवण्यासाठी आयुष्यभर जमापुंजी साठवण्यासाठी आणि तिचा उपयोग करण्यासाठी ईपीएफ खाते अत्यंत फायद्याचे ठरते. दरम्यान ईपीएस योजना ही 1995 साली लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सर्व सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान एखादी व्यक्ती 58 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा नोकरी करत असेल तर, ती व्यक्ती EPS पेन्शनवर अगदी सहजरीत्या हक्क सांगू शकते. म्हणजेच नोकरी करताना पेन्शन मिळवणे सोपे जाईल.

पेन्शनचे गणित :
ईपीएफमधील पेन्शनचे गणित अतिशय सोपे आहे. कर्मचारी स्वतःच्या खात्यामध्ये मूळ पगारातील 12 टक्के रक्कम जमा करतो. इतकेच योगदान कर्मचारी आणि नियुक्तांकडून होत असते. ज्यामध्ये 12 टक्क्यातील 8.33% एवढा भाग ईपीएसमध्ये तर, 3.67% ईपीएफमध्ये जमा केला जातो. दरम्यान 1952 अंतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापना. कंपनीमध्ये असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएस 95 योजना लागू असते.

58 वर्षाआधी नोकरी सोडली तर काय होईल :
समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या नोकरीचे दहा वर्ष पूर्ण केले असतील. त्याचबरोबर त्याचे वय 50 ते 58 वर्षा दरम्यान असेल तर तो व्यक्ती पेन्शन प्राप्त करण्यास पात्र असेल. परंतु ही पेन्शन 58 वर्षानंतर मिळणाऱ्या पेन्शनपेक्षा कमी रक्कम असेल. त्याचबरोबर तुम्ही 58 वर्ष होण्याआधीच क्लेम केलं तर, प्रत्येक वर्षाला 4% ने तुमच्या पेन्शनची रक्कम घटत जाईल.

50 वर्षांपेक्षा कमी असल्यास पेन्शन मिळेल का :
समजा तुमचे वय 50 वर्ष आहे आणि तुम्ही नोकरीची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला पेन्शन प्राप्त होईल का. या प्रश्नाचे उत्तर नाही असं आहे. कारण की, पेन्शन प्राप्तीसाठी वयाची अट 58 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. तुम्हाला पेन्शन नाही पण ईपीएफमध्ये जमा असलेली रक्कम मात्र नक्की मिळेल.

कोणाला मिळतो ईपीएफओचा लाभ :
ईपीएफओचा लाभ केवळ त्याच व्यक्तींना मिळतो ज्यांचं ईपीएफ खात्यात अकाउंट आहे. त्याचबरोबर ईपीएफओच्या नियमानुसार कर्मचाऱ्याला पेन्शन प्राप्त करायची असेल तर त्याला नोकरीचे दहा वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर प्राप्तीसाठी पात्र ठरणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Pension(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x