24 November 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका

EPFO Pension Money

EPFO Pension | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या माध्यमातून रिटायरमेंटनंतर पेन्शन प्राप्ती होते. बऱ्याच कर्मचाऱ्या दीर्घकाळाच्या सर्विसनंतर आपल्याला ईपीएफओच्या माध्यमातून एकूण किती रक्कमेची पेन्शन सुरू होईल याचा व्यवस्थित अंदाज काढता येत नाही. आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त सूत्र सांगणार आहे. या सूत्राचा वापर करून तुम्ही रिटायरमेंटनंतर मिळणारी पेन्शन अगदी सहजपणे कॅल्क्युलेट करू शकता.

या सोप्या फॉर्मुल्यामुळे मोजता येईल रिटायरमेंटनंतर मिळणारी पेन्शन :

पेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एका सूत्राचा वापर करायचा आहे. हे सूत्र अतिशय सोपं आणि पटकन समजेल असं आहे. (ईपीएस = सरासरी पगार × पेन्शनेबल सर्विस / 70). या सूत्राचा वापर करून पुढील कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घेऊया.

अशा पद्धतीने करता येईल सूत्राचा वापर :

फॉर्मुल्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सरासरी पगार म्हणजेच कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि DA होय. ही रक्कम 12 महिन्यांच्या आधारावर कॅल्क्युलेट केली जाते. त्याचबरोबर पेन्शनबल सर्विस या सूत्रामधील वाक्याचा असा अर्थ होतो की, तुम्ही एखाद्या ठिकाणी हे एकूण कामाचे किती वर्ष योगदान दिले. आता आपण असं समजूया की, कर्मचाऱ्याची पैशानेबल सर्विस एकूण 35 वर्ष झाली आहे आणि पेन्शन योग्य वेतन 15,000 हजार रुपये आहे तर, याचे एकंदरीत कॅल्क्युलेशन 15,000×8.33=1250 रुपये महिना असेल.

सविस्तर कॅल्क्युलेशन उदाहरणातून जाणून घ्या :

समजा एखाद्या व्यक्तीचा सरासरी पगार 15000 रुपये आहे आणि त्या व्यक्तीने त्या कंपनीमध्ये कामाचे एकूण 35 वर्ष योगदान दिले आहे तर, सूत्राचा वापर करून, EPS=15000×35/70=7500. सूत्राप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच समजून आले असेल की, कर्मचाऱ्याला मिळणारी वार्षिक पेन्शन 7500 रुपये असणार आहे. तुम्हाला तुमची पेन्शन जाणून घ्यायची असेल तर, कार्यकाळ आणि पगारानुसार सूत्राचा वापर करूनच योग्य रक्कम जाणून घ्या.

फॉर्मुला वापरण्याची ही आहे पात्रता :

ईपीएसचा हा फॉर्म्युला 15 नोव्हेंबर 1995 या सालानंतर संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच लागू करण्यात येतो. कारण की या आधीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम दिले गेले आहेत. या नियमाच्या तरतुदीत ते बसत नाहीत.

पेन्शन पात्रता :

समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि तुम्हाला रिटायरमेंटनंतर टेन्शन हवी असेल तर सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओ खाते उघडून द्यावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला एकाच कंपनीत एकूण दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तरच तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठराल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension Money 10 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x