5 February 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

EPFO Pension Money | खुशखबर, महिना 25,000 रुपये पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना महिना 3571 रुपये पेन्शन मिळणार

EPF Pension Money

EPFO Pension Money | सरकारकडून खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. खाजगी क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण निर्णय ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटन’ अंतर्गत घेतले जातात. आज आम्ही या बातमीपत्रातून ईपीएफ पेंशनबाबत माहिती सांगणार आहोत.

वयाची अट :

ईपीएफओ योजनेअंतर्ग कर्मचाऱ्यांना वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सुरू करण्यात येतो. यामध्ये नोकरीला असतानाच कर्मचाऱ्यांच्या पगारातील आणि कंपनीकडून असे दोन्ही प्रकारे कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात योगदान केले जाते. महत्त्वाचं म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला एखाद्या खाजगी कंपनीमध्ये दहा किंवा त्याहून अधिक वर्षे कामाची झाली असतील तर, तो ईपीएफओ अंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असतो. दरम्यान आज आपण हे जाणून घेणार आहोत की, कर्मचाऱ्याला 25000 रुपये पगार असेल तर, त्याला किती रुपये पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळेल.

पेन्शन मिळवण्यासाठी कंपनी देखील करते योगदान :

कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळणार हे त्यांच्या कामाच्या कालावधीवर आधारित असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे 58 वर्ष उलटून गेल्यानंतर त्याला पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. EPF सदस्याकडून त्याच्या पगाराच्या 12% योगदान दिले जाते. दरम्यान तेवढीच रक्कम कंपनीकडून देखील गुंतवली जाते. यामधील EPS चा भाग 8.33% तर, 3.67% EPF खात्यामध्ये गुंतवला जातो.

कामाची 10 वर्षे आणि पेन्शन पात्र पगार 25,000 रुपये तर, महिन्याला किती पेन्शन मिळणार :

EPS मासिक पेन्शन कॅल्क्युलेशनसाठी एक खास फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. जो ( सरासरी पगार x नोकरीचा कालावधी / 70 ) असा आहे. कर्मचाऱ्याचा सरासरी पगार म्हणजेच त्याच्या शेवटी राहिलेल्या 60 महिन्यांचा म्हणजे 5 वर्षांचा सरासरी पगार.

ठरवलेल्या सूत्राप्रमाणे कर्मचाऱ्याने आपले 10 वर्षे कामाचे योगदान दिले आणि शेवटचा पगार 25,000 रुपये असेल तर, त्याला वयाच्या 58 व्या वर्षापासूनच 3571 रुपये मासिक पेन्शन मिळणे सुरुवात होईल. कोणताही व्यक्ती सूत्रानुसार आपल्याला प्रत्येक महिन्याला किती पेन्शन मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन अगदी सहजरीत्या करू शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension Money Tuesday 04 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPF Pension Money(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x